शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांच्या माहितीसाठी ‘किआॅस्क’ मशिन तयार

By admin | Updated: November 16, 2014 23:55 IST

एमटीडीसीच्यावतीने पर्यटकांना माहिती देण्यासाठी किआॅस्क मशिन तयार

कणकवली : पर्यटनाला चालना देण्याबरोबरच पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांबरोबरच स्थानिक लोककला तसेच सण, उत्सवांची माहिती तत्काळ मिळावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)च्यावतीने ‘किआॅस्क’ ही टचस्क्रीन मशिन तयार करण्यात आली आहे. येथील तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीत लवकरच ही मशिन बसविण्यात येणार आहे.राज्यातील निसर्गसंपन्न अशा विविध भूप्रदेशाची माहिती पर्यटकांना मिळावी, तसेच त्यांना अशा ठिकाणांना भेट देता यावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अद्ययावत माहिती पर्यटकांना देण्यासाठी पावले उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणून एटीएम मशिनसारखी किआॅस्क मशिन तयार करण्यात आली आहे.व्हिडीओ चित्रणाद्वारे पर्यटकांना या मशिनच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे. इंटरनेटद्वारे ही मशिन कार्यान्वित झाल्यानंतर अवघ्या एका ‘टच’वर पर्यटकांना माहिती मिळू शकणार आहे.मराठी व इंग्रजी भाषेतून एमटीडीसीचे संकेतस्थळ त्यावर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटनस्थळे, तेथे जाण्याचा मार्ग, एमटीडीसीचे रिसॉर्ट, तेथील आरक्षणासह विविध माहिती पर्यटकांना मिळणार आहे. यामध्ये समुद्रकिनारे, किल्ले, लेणी, सण, उत्सव, लोककला अशा विविधांगी माहितीचा समावेश असणार आहे. या माहितीच्या आधारे पर्यटनासाठी स्थळ निश्चित करणे पर्यटकांसाठी सोयीचे होणार आहे.दरम्यान, कणकवली तहसीलदार कार्यालयाच्या नूतन इमारतीत प्रवेशद्वाराजवळ ही मशिन बसविण्यात येणार असल्याची माहिती येथील महसूल विभागाच्या सूत्रांनीदिली. (वार्ताहर)एमटीडीसीच्यावतीने पर्यटकांना माहिती देण्यासाठी किआॅस्क मशिन तयार करण्यात आली आहे.