Maharashtra Politics : 'प्रतिभा धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, त्यामुळेच पक्षप्रवेश'; संजय राऊतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 10:40 IST2025-03-11T10:36:09+5:302025-03-11T10:40:36+5:30
Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Politics : 'प्रतिभा धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, त्यामुळेच पक्षप्रवेश'; संजय राऊतांचा मोठा दावा
Maharashtra Politics ( Marathi News ) : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी काल काँग्रेस पक्षाला राजीनामा दिला. यानंतर सायंकाळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. दरम्यान, आता त्यांच्या पक्षप्रवेशावर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया देत नवीन दावा केला आहे. रविंद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचा दावा खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.
Maharashtra Politics: संदीप क्षीरसागरांच्या अडचणी वाढल्या; तहसीलदारांना धमकावल्याचा कॉल व्हायरल
खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले. खासदार राऊत म्हणाले, रविंद्र धंगेकर एक चांगले कार्यकर्ते आहेत, पण त्यांनी मी विकास कामे करण्यासाठी शिंदे गटात जात असल्याचं सांगितलं आहे. त्यांची कोणती शैक्षणिक की समाज उपयोगी कामे थांबली आहेत म्हणून निघाले आहेत? शिंदे गटात, अजित पवार यांच्या पक्षात हे जे प्रवेश सुरू आहेत हे प्रवेश भितीपोटी सुरू आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
"स्वत: एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी भीतीपोटीच पक्षांत्तर केलं आहे, अजित पवार आणि त्यांच्या लोकांनीही भीतीपोटीच पक्षांत्तर केलं आहे. एखाद्याने पक्षप्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते. ही एक सिस्टीम राबवली जात आहे. रविंद्र धंगेकर खरेखर का गेले हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरुन सांगायला पाहिजे. खरोखर कामासाठी गेलो की कसबा मतदारसंघात गणेश पेठेत एक जागा आहे, ही प्रतिभा रविंद्र धंगेकर आणि पार्टनर इतरांच्या नावावर आहे. त्या जागेची किंमत ६० कोटी रुपये आहे. ही जागा विकासासाठी ताब्यात घेतल्यावर लोकसभा निवडणुकी काळात भाजपाने मुस्लिम समाजातील काही लोकांना हाताशी धरुन भाजपाची लोक कोर्टात गेले. त्यात त्यांचं काम अडवण्यात आले, प्रतिभा धंगेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ठेवली, असा मोठा आरोप खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.
... म्हणून ते शिंदे गटात गेले
'मराठी लोकांनी व्यवसाय केला पाहिजे, यात मराठी माणसांनी गुंतवणूक केली आहे. धंगेकर यांच्याबरोबर जे पार्टनर आहेत ते भाजपाचे माजी नगरसेवक आहेत. त्यामध्ये मनसेच्या एका माजी नगरसेवकाची पत्नी सुद्धा आहे. त्यांनी केलेल्या गुंतवणूकीत त्यांची कोंडी करण्यात आली आहे. त्यांच्या पत्नीच्या अटकेच्या भीतीने आमचे प्रिय रविंद्र धंगेकर शिंदे गटात गेले आहेत, वायकरांसारखेच धंगेकर यांचे प्रकरण आहे, असा दावाही संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला.