शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

विकृत कोरटकरचा नवा प्रताप; पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी शेअर केले जुने फोटो? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:55 IST

प्रशांत कोरटकरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून तो दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे.

Prashant Koratkar: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा विकृत प्रशांत कोरटकर फरार आहे. या कोरटकरचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून तो दुबईला पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र शोध घेत असलेल्या पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी प्रशांत कोरटकरने आपला जुना फोटो शेअर केल्याची माहिती असून तो महाराष्ट्रातच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोल्हापूरच्या सत्र न्यायलयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्याच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. त्याला बेड्या ठोकण्यासाठी कोल्हापूर पोलीस चंद्रपुरात पोहोचले आहेत. परंतु तो अद्याप हाती लागलेला नाही. अशातच त्याचा दुबईतील फोटो व्हायरल झाल्याने तो देशाबाहेर पसार झाल्याची चर्चा रंगू लागली. मात्र हा फोटो जुना असल्याचं पोलिसांचं म्हणणं असून त्याचा शोध सुरू आहे.

नागपूर पोलिसांकडून सहकार्य नाही?

प्रशांत कोरटकरचा शोध घेत असताना नागपूर पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य केलं जात नसल्याचं कोल्हापूर पोलिसांचं म्हणणं आहे, असा दावा वकील असीम सरोदे यांनी केला आहे. कोरटकर याची पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मैत्री आहे. तसंच त्याचे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचेही अनेक फोटो समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरटकरला अद्याप अटक न झाल्याने गृहखात्याच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. जामिनावर मुंबईत सोमवारी सुनावणी

कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्याने प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी शुक्रवारी दाखल केलेली याचिका तहकूब करून सोमवारी न्यायालयासमोर सुनावणी होत आहे. अटक टाळण्यासाठी कोरटकरने प्रयत्न सुरू केले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस