काँग्रेसची उमेदवारी प्रकाश तायडे यांना

By Admin | Updated: May 28, 2014 23:58 IST2014-05-28T23:29:36+5:302014-05-28T23:58:19+5:30

अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणूक

Prakash Tayade, the candidate of Congress, was nominated for the candidature | काँग्रेसची उमेदवारी प्रकाश तायडे यांना

काँग्रेसची उमेदवारी प्रकाश तायडे यांना

अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून, अकोल्याचे प्रकाश तायडे यांना बुधवारी उमेदवारी जाहीर झाली आहे.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी कोणाला जाहीर होते, याकडे लक्ष लागले असतानाच, बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत काँग्रेस शिक्षक सेलचे अमरावती विभागीय अध्यक्ष प्रकाश तायडे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली.

Web Title: Prakash Tayade, the candidate of Congress, was nominated for the candidature