Prakash Ambedkar Statement on the Constitution of India | भारताच्या संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो: प्रकाश आंबेडकर

भारताच्या संविधानाला मी खेकड्याची उपमा देतो: प्रकाश आंबेडकर

मुंबई - निवडणुका आल्या की देशाला मोठा धोका असल्याचे चित्र निर्माण केले जाते. देशाच्या संविधानाने कुठलेही एक जात दुसऱ्या जातीला कैद करणार नाही, अशी व्यवस्था केलेली आहे. म्हणून मी या संविधानाला खेकड्याची उपमा देतो, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहेत. माळी समाज सत्ता संपादन प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

पुन्हा  आपल्या देशावर बाहेरून राज्य करायला आता कुणीच येणार नाही. त्याचे कारण म्हणजे देशावर राज्य करायला आधी त्या देशाची आर्थिक नाडी हातात पाहिजे. त्याचप्रमाणे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्याला बंदुकीचा आणि जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

त्यामुळे आता ही आपल्या जातीय व्यवस्थामधील लढाई असल्याचे यावेळी आंबेडकर म्हणाले. एक जात दुसऱ्या जातीला कैद करत असल्याची परिस्थिती निर्माण केली जात आहे. मात्र देशाच्या संविधानाने कुठलेही एक जात दुसऱ्या जातीकडून कैद  करणार नाही, अशी व्यवस्था केलेली आहे. म्हणून मी या संविधानाला खेकड्याची उपमा देतो, असेही आंबेडकर म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर सद्या ठीक-ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र महाघाडी सोबत आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी जाणार का ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत आघाडीत जाण्याबाबत प्रकाश आंबडेकर हे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Web Title: Prakash Ambedkar Statement on the Constitution of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.