शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

“भाजपा संपली, राज ठाकरेंनी मोदी पार्टीला पाठिंबा दिला”; प्रकाश आंबेडकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 09:41 IST

Prakash Ambedkar News: राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्याच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी टीकास्त्र सोडले.

Prakash Ambedkar News: देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. माझी नरेंद्र मोदींकडून त्याबाबत खूप अपेक्षा आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले. शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी आपला निर्णय घोषित केला. मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले. यावरून राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे यांच्या निर्णयावर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तर महाविकास आघाडीतील नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होऊ शकला नाही. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर प्रचाराला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी खरमरीत शब्दांत टीका केली.

भाजपा संपली, राज ठाकरेंनी मोदी पार्टीला पाठिंबा दिला

प्रसारमाध्यमांशी बोलताना पत्रकारांनी प्रकाश आंबेडकरांना राज ठाकरे यांच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारला. यावर, तुम्ही भाजपाचे नाव ऐकले का, बीजेपी पार्टी संपली आहे, तिथे आता मोदी पार्टी आली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जो पाठिंबा दिला, तो बरोबर दिला. राज ठाकरेंनी मोदी पार्टीला पाठिंबा दिला. बीजेपी पार्टीला पाठिंबा दिलेला नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान,  प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येतील असे वाटले होते. पण ते शक्य झाले नाही. प्रकाश आंबेडकर काहीही बोलले तरीही आम्ही उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी संविधान रक्षणासाठी दिलदारी दाखवायला हवी. भविष्यात काय होते पाहू, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही निवडणूक लढवत आहोत. त्यांनी त्यांची निवडणूक लढवावी. आम्ही आमची निवडणूक लढवतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेMNS Gudi Padwa Rallyमनसे गुढीपाडवा मेळावाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४