माझे आजोबा पडले,वडील पडले; पडण्याच्या ऐवजी नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2019 04:56 PM2019-08-04T16:56:49+5:302019-08-04T17:03:13+5:30

मला पडण्याची भीती असती तर मी भाजपमध्ये गेलो असतो

Prakash Ambedkar on congress Party | माझे आजोबा पडले,वडील पडले; पडण्याच्या ऐवजी नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर

माझे आजोबा पडले,वडील पडले; पडण्याच्या ऐवजी नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

मुंबई - नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा पराभव झाला. प्रत्येकवेळी मला पाडण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत असते. मात्र निवडणुकीत माझे आजोबा पडले,वडील पडले त्यामुळे माझ्यासाठी निवडणुकीत पडणे हे काही नवीन नसल्याचे टोला आंबेडकर यांनी  काँग्रेसला लगावला. रविवारी पुणे इथे पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा सोलापूर आणि अकोला दोन्ही ठिकाणाहून पराभव झाला होता. काँग्रेस उमेदवारामुळे आंबेडकर यांना अनकेदा अकोला मतदारसंघातून पराभव स्वीकरावा लागला. त्यामुळे महाघाडीबाबत काँग्रेससोबत बोलण्यासाठी चालढकल केली जात आहे का ? या प्रश्नाला उत्तर देतांनी आंबेडकर यांनी काँग्रेसवर खोचक टीका केली. निवडणुकीत माझे आजोबा पडले,वडील पडले त्यामुळे नवीन काहीच नाही, पडण्याच्या ऐवजी. असे आंबेडकर म्हणाले. मला पडण्याची भीती असती तर मी भाजपमध्ये गेलो असतो असेही ते म्हणाले.

मला निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेस-भाजप सारखेच आहे. माझ्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या नेत्यांसमोर झोळी पसरवून याचना करत मला पाडले होते, असा आरोप आंबेडकर यांनी यावेळी केला. त्यामुळे अकोलामध्ये भाजप आणि काँग्रेस एकच असल्याची टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली.

Web Title: Prakash Ambedkar on congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.