शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न, प्रकाश आंबेडकरांचा मविआवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 5:53 AM

नव्या आघाडीचे संकेत; २ एप्रिलला सर्व स्पष्ट करणार

मुंबई : महाविकास आघाडीत आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत येत्या दोन एप्रिल रोजी आम्ही सगळे स्पष्ट करणार आहोत, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

जोपर्यंत ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्याशी चर्चा सुरू होती, तोपर्यंत सर्व काही सकारात्मक होते. चर्चा पुढे जात होती. पण, नंतर कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेत असल्याचे दिसू लागले, असा आरोपही आंबेडकर यांनी केला. माझे दरवाजे आजही बंद झालेले नाहीत. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत. आम्ही विविध संघटनांशी चर्चा करत आहोत, त्यांच्याबरोबर कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची, याचा अजेंडा तयार केला जातोय, असेही ते म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, शिवसेना आणि काँग्रेस यांचे सूत जुळलेले नाही, हे मी आधीपासून सांगत होतो, ते आता उघड होऊ लागले आहे. राज्यात ज्या पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे, तो राहत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी, हे आमचे मत होते. पण, आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. आता आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करत आहोत. कुणाला बाजुला टाकू नये, सर्वांना सोबत घेऊन काम करावे, असे आमचे म्हणणे आहे, असेही आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले. 

राऊत चुकीची माहिती देत आहेतसंजय राऊत महाविकास आघाडीच्या नावाने चुकीची माहिती देत आहेत, ते आघाडीत बिघाडी करण्याचे काम करत आहेत. आमच्याकडे तीन जागांचा प्रस्ताव आला होता, असे आंबेडकर यांनी सांगितले.

मराठा समाज आता एकच उमेदवार देणारमराठा समाज गावागावातून उमेदवार देणार होते.  आता प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार देण्याचे ठरत आहे. जरांगे-पाटील यांच्याकडून उद्यापर्यंत माहिती येऊ शकते, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

लढाई वंचित विरुद्ध भाजपचपहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची मुदत संपत होती. त्यामुळे आम्ही पहिल्या टप्प्याचे उमेदवार जाहीर केले. एका जागेवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. भाजपला मोकळे रान देऊ इच्छित नव्हतो, म्हणून आम्ही उमेदवार दिले. ही लढाई वंचित विरूद्ध भाजप, अशी असेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी