Pragati , Koyna Express cancelled for next ten days | प्रगती, कोयना एक्सप्रेस पुढील दहा दिवस रद्द
प्रगती, कोयना एक्सप्रेस पुढील दहा दिवस रद्द

ठळक मुद्दे मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रात तांत्रिक तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे

पुणे : मध्य रेल्वेकडून मंकी हिल ते कर्जत या घाटक्षेत्रात विविध तांत्रिक  तसेच देखभाल-दुरूस्तीची कामे केली जाणार आहेत. ही कामे पुढील दहा दिवस सुरू राहणार असल्याने या कालावधीत प्रगती एक्सप्रेससह इतर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस पुण्यातूनच सोडण्यात येणार आहे. तर अन्य काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. 
मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांपुर्वी घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी भर पावसातच रेल्वेकडून दुरूस्तीची कामे करण्यात आली होती. पण या भागात आणकी काही कामे करणे आवश्यक असून पुढील दहा दिवस ही कामे सुरू राहणार आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान धावणारी प्रगती एक्सप्रेस पुर्णपणे तर मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस अंशत: रद्द करण्यात आली आहे. यांसह दहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रगती एक्सप्रेस दि. १५ आॅक्टोबरपर्यंत धावणार नाहीत. तर पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी दि. ५ ते १४ आॅक्टोबर या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावेल.
काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापुर-मुंबई कोयना एक्सप्रेस ही गाडी दि. १४ आॅक्टोबरपर्यंत पुण्यापर्यंत धावेल. ही गाडी नंतर पुण्यातून सोडण्यात येईल. मुंबई ते पुणे यादरम्यान गाडी धावणार नाही. तसेच हुबळी-मुंबई-हुबळी (दि. ५ ते १४), हैद्राबाद-मुंबई-हैद्राबाद (दि. ७ ते १५), विशाखापट्टण-मुंबई (दि. ५ ते १४), नांदेड-पनवेल-नांदेड (दि. ६ ते १५) या गाड्यांही पुण्यापर्यंतच धावतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
------------- 
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (कंसात कालावधी)
- पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस (दि. ६ ते १५ आॅक्टोबर)
- मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस (दि. १५ आॅक्टोबर)
- हैद्राबाद-मुंबई एक्सप्रेस (दि. ६ आॅक्टोबर)
- मुंबई-पंढरपुर पॅसेंजर (दि. १० ते १२ आॅक्टोबर)
- पंढरपुर-मुंबई पॅसेंजर (दि. ६, ११,१२ व १३ आॅक्टोबर)
- मुंबई-विजापुर पॅसेंजर (दि. ६ ते ९ व १३ ते १४ आॅक्टोबर)
- विजापुर-मुंबई पॅसेंजर (दि. ७ ते १० व १४ ते १४ आॅक्टोबर)
- नांदेड-पनवेल पॅसेंजर (दि. १२ आॅक्टोबर)
- पनवेल-नांदेड पॅसेंजर (दि. १३ आॅक्टोबर)


Web Title: Pragati , Koyna Express cancelled for next ten days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.