शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑपरेशन सिंदूर’विरोधात पोस्ट, केरळमधील नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक, आरोपीकडून पत्रकार असल्याचा दावा

By योगेश पांडे | Updated: May 9, 2025 00:26 IST

Nagpur Crime News: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याविरोधात सोशल माध्यमांवर गरळ ओकणाऱ्या नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्याने देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. सरकारविरोधात संघर्ष पुकारण्याची त्याची तयारी होती.

- योगेश पांडे  नागपूर - ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याविरोधात सोशल माध्यमांवर गरळ ओकणाऱ्या नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्याने देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. सरकारविरोधात संघर्ष पुकारण्याची त्याची तयारी होती. अटकेनंतर त्याने पत्रकार असल्याचा दावा केला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी ही कारवाई केली.

रेजाझ माडेपड्डी शिबा सिदीक (वय २६ एडापल्ली, केरळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे. रेजाझ हा काही दिवसांअगोदर दिल्लीत झालेल्या परिषदेत सहभागी झाला होता. ही परिषद देशात समाजविरोधी कारवाया करणाऱ्या पत्रकारांच्या सुटकेसाठी आयोजित करण्यात आली होती. तेथे त्याची काही नक्षलसमर्थक लोकांशीदेखील भेट झाली होती. तो स्वत:ला मुक्त पत्रकार व विद्यार्थी कार्यकर्ता म्हणवायचा. 'डेमोक्रॅटिक स्टुडंट्स असोसिएशन'शी संबंधित असलेला रेजाझ दिल्लीहून केरळला परतत असताना त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी नागपुरात आला होता. त्याची मैत्रीण ईशा हीदेखील त्याच्या कृत्यात सहभागी होती. पोलिसांना याची माहिती मिळताच लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेलमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले. तो 'मकतूब मीडिया' आणि 'द ऑब्झर्व्हर पोस्ट' सारख्या आउटलेटसाठी लिहितो. ज्यामध्ये जातीय भेदभाव, सांप्रदायिक हिंसाचार, राज्य दडपशाही आणि उपेक्षित समुदायांच्या हक्कांशी संबंधित कथा कव्हर करतो, असा दावा करण्यात आला आहे. लकडगंज पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४९ (भारत सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याची तयारी), १९२ (दंगल घडविण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे), ३५१ (गुन्हेगारी धमकी देणे) आणि ३५३ (सार्वजनिक गैरप्रकार घडवून आणणारी विधाने) यासह इतर तरतुदींखाली गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

पाकिस्तानच्या समर्थनार्थ केली पोस्टऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्यामुळे रेजाझ संतप्त झाला होता. तो सेंट्रल अव्हेन्यूवरील अग्रसेन चौकात असलेल्या एअरगनच्या दुकानात पोहोचला. तिथे दोन बंदुकींसह फोटो काढला. त्यानंतर त्याने सोशल माध्यमांवर स्वतःचा फोटो पोस्ट केला आणि भारतीय सैन्याविरोधात लिखाण करत ते पाकिस्तानमध्ये निष्पाप लोक आणि मुलांना मारत आहेत, अशी पोस्ट लिहीली. गुप्तचर संस्था सिद्दीकीच्या हालचालींवर लक्ष ठेवून होत्या. सिद्दीकीची पोस्ट आणि फोटो पाहून ते सावध झाले व नागपूर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

नक्षलवाद्यांसाठी पैसे गोळा करण्यासाठी बारकोडआरोपीच्या सामानाची झडती घेत असताना, पोलिसांना छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील बस्तर रेंजमधील करेगुट्टा टेकडीवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांवर चालवलेल्या कारवाईशी संबंधित पत्रके सापडली. पत्रकांमध्ये, या कारवाईचे वर्णन आदिवासींसाठी दडपशाही करणारे असे करण्यात आले होते. प्रिस्क्रिप्शनमध्ये तीन बारकोड देखील होते. त्यांचे स्कॅनिंग केल्यानंतर, पीडितांसाठी २० ते २५ हजार रुपये देण्याचे आवाहन करण्यात आले. हे पत्रक सरकारने बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) ने जारी केले होते. या पत्रकावरून आरोपीने नक्षलवाद्यांना आर्थिक मदत करत असल्याचे उघड झाले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीCrime Newsगुन्हेगारीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरnagpurनागपूर