The possibility of rainfall in Konkan: two more days of heat wave in Vidarbha | कोकणात पावसाची शक्यता : विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट
कोकणात पावसाची शक्यता : विदर्भात आणखी दोन दिवस उष्णतेची लाट

पुणे : कोकण, गोवा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली असून विदर्भात पुढील दोन दिवस काही ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भाग आणि तेलंगणा येथे उष्णतेची लाट आली आहे़.  चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता पुन्हा कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे़. मंगळवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून ८ मे रोजी कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. ९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे़. १० मे रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़. पुढील दोन दिवस विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ .
 

  • ८ मे रोजी पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे़ रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८ व ९ मे रोजी पावसाची शक्यता आहे़. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ९ व १० मे रोजी पावसाची शक्यता आहे़. पुणे व अहमदनगर जिल्ह्यात १० मे रोजी पावसाची शक्यता आहे़ .

 

Web Title: The possibility of rainfall in Konkan: two more days of heat wave in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.