मुख्यमंत्र्यांकडील खाती तूर्तास  अन्य मंत्र्यांकडे

By यदू जोशी | Updated: August 17, 2022 01:36 IST2022-08-17T01:34:54+5:302022-08-17T01:36:23+5:30

हे मंत्री त्यांना वाटून दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खात्यांची उत्तरे सभागृहात देतील. या मंत्र्यांकडील मूळ खाती त्यांच्याकडे कायम असतील.

Portfilio from the Chief Minister are currently with other ministers | मुख्यमंत्र्यांकडील खाती तूर्तास  अन्य मंत्र्यांकडे

मुख्यमंत्र्यांकडील खाती तूर्तास  अन्य मंत्र्यांकडे

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या बुधवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या दृष्टीने आपल्याकडील खाती ही अन्य सहकारी मंत्र्यांना तूर्तास दिली आहेत.

माहिती तंत्रज्ञान खाते उदय सामंत यांना, परिवहन शंभूराज देसाई यांना, पणन दादा भुसे, सामाजिक न्याय संजय राठोड, जलसंधारण तानाजी सावंत, मदत व पुनर्वसन अब्दुल सत्तार, पर्यावरण दीपक केसरकर आणि अल्पसंख्यांक विकास संदिपान भुमरे अधिवेशनापुरते वाटप मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

हे मंत्री त्यांना वाटून दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या खात्यांची उत्तरे सभागृहात देतील. या मंत्र्यांकडील मूळ खाती त्यांच्याकडे कायम असतील.

Web Title: Portfilio from the Chief Minister are currently with other ministers