शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

सोळा विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे

By admin | Updated: July 30, 2016 04:25 IST

शाळेतील मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला आहे. कलिना येथील शाळेत हा प्रकार घडला असून, पालकांनी दोन शिक्षकांना चांगलाच चोप देत वाकोला

मुंबई : शाळेतील मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला आहे. कलिना येथील शाळेत हा प्रकार घडला असून, पालकांनी दोन शिक्षकांना चांगलाच चोप देत वाकोला पोलिसांच्या स्वाधीन केले.कलिना परिसरातील शास्त्रीनगरमध्ये एका शाळेत विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार सुरू असल्याचे शिक्षण समितीच्या माजी अध्यक्ष आणि सध्या सदस्य असलेल्या वॉर्ड क्रमांक १२१च्या नगरसेविका रितू तावडे यांना गुरुवारी रात्री समजले. या शाळेत शिकविणाऱ्या तसेच कर्करोगाने ग्रस्त असलेल्या शाहीन खान या शिक्षिकेची बीकेसीच्या शाळेत बदली केली जात होती. त्याची चर्चा करताना तावडे यांनी सहज या शाळेतील विविध इयत्तेतील मुलींची चौकशी केली. तेव्हा दोन शिक्षक त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे त्यांनी तावडे यांना सांगितले. त्यानुसार शुक्रवारी तावडेंनी शिक्षण विभागाच्या काही सदस्यांसोबत तडक या शाळेत जात या दोन्ही शिक्षकांना जाब विचारला. त्या वेळी चिडलेल्या पालकांनी या दोघांना चांगलाच चोप देत त्यांच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर पोलिसांना बोलावून त्या दोघांना त्यांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)हमारे साथ कुछ ठीक नही हो रहा !‘मी इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थिनींशी सहज चर्चा केली. तेव्हा ‘हमारे साथ कुछ ठीक नही हो रहा, दो सर हमारे साथ गलत करते है,’ असे त्यांनी सांगितल्याचे तावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ज्या सोळा मुलींशी मी बोलले त्यांनी याच दोघांची नावे घेतली, असेही त्यांनी नमूद केले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही त्या दोघांच्या निलंबनाची तसेच पुन्हा त्यांना अन्य कोणत्याही शाळेत सेवेत न ठेवण्याची कारवाई करण्याची मागणी केल्याचेही त्या म्हणाल्या.अद्याप तक्रारदारांचा पुढाकार नाही‘ज्या दोन शिक्षकांवर आरोप करण्यात आला आहे, त्यांना आम्ही ताब्यात घेतले आहे. दोघांची चौकशी करीत आहोत. ज्यात त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे; तसेच अद्याप या दोघांविरोधात आमच्याकडे एकही तक्रारदार आलेला नाही. पालकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आम्ही केल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव व्हावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.