शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

पीओपी मूर्तींबाबत ठोस भूमिका नाही, मूर्तिकारांसमवेतची बैठक निष्फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:27 IST

POP Ganesh Idols: गणपती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) नसाव्यात असा स्पष्ट आदेश मागील वर्षी उच्च न्यायालयाने देऊनही यावर्षी या आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत राज्य सरकारची ठोस भूमिका ठरलेली नाही.  

मुंबई -  गणपती मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) नसाव्यात असा स्पष्ट आदेश मागील वर्षी उच्च न्यायालयाने देऊनही यावर्षी या आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत राज्य सरकारची ठोस भूमिका ठरलेली नाही.  या मुद्यावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीतून काही ठोस निष्पन्न झाले नाही. या विषयावर अभ्यास करण्यासाठी सरकारच्यावतीने तीन आठवड्यांचा अवधी घेण्यात आला  आहे. 

‘पीओपी’ मूर्तींवरील बंदीच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृहात मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस केंद्रीय  तसेच महाराष्ट्र   प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव, बीड जिल्हा कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे प्रमुख कार्यवाह उपस्थित होते. या बैठकीत न्यायालयाच्या आदेशाचा   मुद्दा उपस्थित झाला.  आदेशाचा   भंग झाला तर तो न्यायालयाचा अवमान ठरू शकतो, याकडे काही सदस्यांनी लक्ष वेधले.  शाडूच्या मूर्ती बनविण्यासाठी लागेल तेवढी माती देण्यास मुंबई महापालिका तयार आहे, याचीही आठवण करून देण्यात आली. 

संभ्रम कायममूर्ती शाडूच्याच करायच्या की  पीओपीच्या याबाबत संभ्रम  कायम आहे.  यापूर्वीही पालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, समन्वय समिती आणि मूर्तिकारांची  बैठक झाली होती. समन्वय  समितीने न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष वेधले होते. तर शाडूच्या मातीला आणखी काय पर्याय आहे, अशी विचारणा मूर्तिकारांनी केली होती. मात्र मंडळाच्यावतीने अन्य पर्याय सुचविण्यात आला नव्हता, असे मूर्तिकारांचे   म्हणणे आहे. 

अंमलबजावणीवर प्रश्नचिन्हआजच्या बैठकीतही न्यायालयाच्या आदेशाबाबत सरकारची निश्चित भूमिका दिसून आली नाही. तसेच २ फेब्रुवारीपासून माघी गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी  होणार की नाही याबाबत  संभ्रम  आहे. त्यामुळे यंदाही अनेक मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्ती बनवल्या आहेत. तसेच आजच्या बैठकीतील चर्चा प्रसारमाध्यमांपुढे उघड करू नये अशी सूचनाही मुंडे यांनी मूर्तिकार तसेच समन्वय समितीला केल्याची माहिती उघड झाली आहे.

न्यायालयाचा निर्णय असेल बंधनकारकमागील वर्षी गणेशोत्सवाच्या  काही दिवस आधी पीओपी मूर्तींबाबाबत न्यायालयाचा निर्णय आला होता. मात्र तोपर्यंत मूर्ती तयारही झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या वर्षी सूट द्यावी, अशी विनंती राज्य सरकारच्यावतीने न्यायालयाला करण्यात आली होती. त्यानंतर सूट देण्यातही आली  होती. मात्र यावर्षी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार