पोलिसांनी केला तोतया तृतीयपंथीयांचा भांडाफोड
By Admin | Updated: February 10, 2017 20:01 IST2017-02-10T20:01:24+5:302017-02-10T20:01:24+5:30
केवळ साडी नेसून टाळ्या वाजवत दोन-पाचशे रुपयांची कमाई रोज विनासायास होत असल्याने...

पोलिसांनी केला तोतया तृतीयपंथीयांचा भांडाफोड
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 10 - केवळ साडी नेसून टाळ्या वाजवत दोन-पाचशे रुपयांची कमाई रोज विनासायास होत असल्याने तोतया तृतीयपंथीयांनी शहरात धुमाकूळ माजविल्याने पोलीसांनी या तोतया तृतीयापंथीयांचा शुक्रवारला भांडाफोड केला. या तोतयांना बायका व मुले असल्याचे उघडकीस आले.
अलीकडच्या काळात बरेच भुरटे चोरटे, भामटे, काम करण्याचा कंटाळा आलेल्या तरूणांनी चक्क साडी-चोळी नेसून टाळ्या वाजवायच्या अन् दिवसाकाठी शे-पाचशे रुपए कमवायचा गोरखधंदा अंगिकारल्याचे शहर पोलीसांनी उघडकीस आणले. गेल्या दोन दिवसापासून शहरात साडी-चोळी नेसून व्यावसायीक, वाटसरू, शासकीय कार्यालयातील कर्मचारी यांना वेठीस धरून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा सपाटा चौघांनी सुरू केला होता.
यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील पंजाब लक्ष्मण सावंत, रमेश नामदेव सोळंके, अनिल राजू सोळंके व राजू किसन बाबर यांचा समावेश आहे. या चौघांनी दिवसभर पैसे जमा करून ग्रामीण पोलीस स्टेशन समोर असलेल्या उघड्या जागेवर आपली वेशभुषा बदलून पुर्ववत सामान्य पुरूषांची कपडे परिधान केले. यानंतर या चौघांनी जमा झालेल्या पैशामधुन दारू पिऊन रस्त्यावर धिंगाना घातला असता वेळीच पोलीसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर कारवाई केली.
सदर कारवाई पोलीस उपनिरिक्षीक मस्के, पोलीस उपनिरिक्षक नम्रता राठोड, मनोहर अष्टोनकर, राजेश बायस्कर , गजानन कराळे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे तोतयागिरी करणा-या ईतर युवकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे.