शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 06:08 IST

पोलिसांच्या या कारभारावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत पोलिस महासंचालकांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : ठाण्यातील एका पोलिस ठाण्यात टीव्ही., एसी, वॉटर कुलर, प्रिंटर, कॉम्प्युटर यांसारखी महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली गेली आणि पुरवठादाराने पैशांची मागणी केली असता पोलिसांनी त्याला कोणताही मोबदला न देता वापरलेल्या वस्तू परत केल्या होत्या. पोलिसांच्या या कारभारावर न्यायालयाने नाराजी व्यक्त करत पोलिस महासंचालकांना या प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात व्यावसायिक नैनेश पांचाळ याच्याविरोधात धनादेश न वटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी न्या. सारंग कोतवाल व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर झाली. पांचाळने इलेक्ट्रॉनिक दुकानातून एसी, वॉटर कुलर, प्रिंटर, टीव्ही. इत्यादी महागड्या वस्तू विकत घेतल्या आणि पैसे दिले नाहीत, तसेच त्याने दिलेला चेकही बाऊन्स झाला, असे तक्रारदाराने म्हटले होते.पांचाळ यांनी सर्व वस्तू पोलिस ठाण्याला पुरविल्याचे सांगत पुरवठादाराला ३.७५ लाख रुपये देण्याचे मान्य केले. तेव्हा न्यायालयाने त्यांच्यावरील गुन्हा रद्द केला.

गंभीर कारवाई आवश्यक : न्यायालय‘तक्रारीतील आरोप खरे असतील, तर गंभीर कारवाई आवश्यक आहे. एका पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी योग्य प्रक्रिया पार न पाडता खासगी पक्षाकडून इतकी महागडी उपकरणे घेऊ कसे शकतात?  न्यायालयाने पोलिस महासंचालकांना पोलिस उपायुक्त (सीआयडी) दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देशही दिले.

सुप्रीम कोर्टानेही सुनावलेमालमत्तेच्या चाव्या घेऊन स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याच्या पोलिसांच्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच टीका केली आहे. स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याची पोलिसांची कारवाई संपूर्ण अराजकता दर्शवते. कोणत्याही परिस्थितीत, पोलिसांना स्थावर मालमत्तेच्या ताब्यात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. कारण अशा कृतीला कायद्याच्या कोणत्याही तरतुदीद्वारे मंजुरी मान्यता नाही.- न्यायमूर्ती सी. टी. रविकुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता

टॅग्स :PoliceपोलिसCourtन्यायालयthaneठाणे