शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

पनवेलमधील संशयित निघाला पोलीसपुत्र

By admin | Updated: September 25, 2016 06:04 IST

उरण येथे दहशतवादी दिसल्याच्या वृत्तानंतर शनिवारी पनवेल परिसरात तीन दहशतवादी पकडल्याचे व पाकिस्तानी चॉकलेटची बॅग सापडल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण निर्माण

नवी मुंबई : उरण येथे दहशतवादी दिसल्याच्या वृत्तानंतर शनिवारी पनवेल परिसरात तीन दहशतवादी पकडल्याचे व पाकिस्तानी चॉकलेटची बॅग सापडल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर ‘त्या‘अफवा असून संशयित दहशतवादी म्हणून ताब्यात घेतलेले काश्मिरी असल्याचे व त्यापैकी एक जण पोलीसपुत्र असल्याचे समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांनी सुस्कारा सोडला.उरणमध्ये संशयित दहशतवादींच्या शोधासाठी सुरू असलेली मोहीम थांबवण्याच्या प्रयत्नात पोलीस असताना शनिवारी पनवेल परिसरात तीन दहशतवादी पकडल्याची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही क्षणांत ही माहिती शहरात पसरली. प्रत्यक्षात मात्र पोलिसांच्या चौकशीत त्या तिघांकडे काहीच संशयास्पद हातीलागले नाही. उलट ज्याला संशयित दहशतवादी म्हणून ताब्यात घेतले, तो जम्मू येथील एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचे तसेच त्याचे इतर नातेवाईकही जम्मू पोलीस अधिकाऱ्यांचे खासगी चालक असल्याचे उघड झाले. सखिंदर सैफ असे त्याचे नाव असून तो सात वर्षांपासून मुंबईत कंटेनर चालकाचे काम करत आहे. शनिवारी संध्याकाळी तो बेबी डायपरचा कंटेनर घेऊन गवाणफाटा मार्गे सुरतला चालला होता. यावेळी नोकरीच्या शोधात जम्मू येथून मुंबईला आलेले दोन नातेवाईक त्याच्यासोबत होते. गवाणफाटा येथे कंटेनर बंद पडल्याने तो दुरुस्त करण्यासाठी सखिंदर हा रस्त्यालगत कपडे बदलत होता. याचवेळी त्याठिकाणावरून जाणाऱ्या ‘सीआयएसएफ’च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या हालचालींवर संशय आला. त्यांनी या तिघा संशयित काश्मिरी तरुणांची माहिती पनवेल पोलिसांना दिली.त्यामुळे तिघा दहशतवाद्यांना पकडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. याचदरम्यान पनवेलमध्येच पाकिस्तानी चॉकलेटची बॅग आढळल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. ती बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली असता, त्यामध्ये दुबईचे चॉकलेट व एनर्जी ड्रिंक होते. पनवेलमधील एका हिंदी भाषक व्यक्तीला दोन दिवसांपूर्वी मार्केटमध्ये बेवारस बॅग आढळली होती. त्याने ही बॅग घरी आणली असता आतमध्ये चॉकलेट होते. परंतु त्यावर ऊर्दूमध्ये लिहिलेले असल्यामुळे ती दहशतवाद्यांची बॅग असू शकते अशी शेजाऱ्यांनी भीती दाखवली. यामुळे त्याने शनिवारी ती बॅग परत घराजवळ ठेवून त्याची माहिती पोलिसांना दिली. परंतु चौकशीत त्याने संपूर्ण प्रकरणाची कबुली दिल्याचे सहाय्यक आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. तर ‘सीआयएसएफ’च्या सांगण्यावरून चौकशीसाठी ताब्यात घेतलेले तिघेही दहशतवादी नसल्याने सोडून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)काश्मिरी तरुण हा कंटेनर चालकसखिंदर सैफ हा काश्मिरी तरुण सात वर्षांपासून मुंबईत कंटेनर चालकाचे काम करत आहे. शनिवारी त्याला संशयित दहशतवादी समजून हटकण्यात आले. पण तो काश्मीरमधील पोलिसाचा मुलगा निघाला.पनवेलमध्येच पाकिस्तानी चॉकलेटची बॅग आढळल्याच्या चर्चेने खळबळ उडाली होती. ती बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली असता, त्यामध्ये दुबईचे चॉकलेट व एनर्जी ड्रिंक होते.सर्च आॅपरेशन थांबलेउरणमध्ये काही संशयित दहशतवाद्यांना पाहिल्याचे दोन शाळकरी मुलांनी सांगितल्यानंतर राज्यभरात अलर्ट जारी करून पोलिसांनी २५ किमीचा परिसर अक्षरश: पिंजून काढला. पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा हे सर्च आॅपरेशन थांबविले. ही माहिती देणारी विद्यार्थिनी वक्तव्यावर ठाम असल्याने या संशयितांबाबतचे गूढ कायम आहे.