पोलिसाने केला बायकोचा खून, 4 दिवसाची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2017 18:32 IST2017-02-10T18:32:03+5:302017-02-10T18:32:03+5:30
जनतेचे संरक्षण करणा-या पोलीस खात्यातील बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस स्टेशनमध्ये सेवेत असलेल्या हवालदाराने त्याच्या पत्नीचा खून

पोलिसाने केला बायकोचा खून, 4 दिवसाची पोलीस कोठडी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.10 - जनतेचे संरक्षण करणा-या पोलीस खात्यातील बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस स्टेशनमध्ये सेवेत असलेल्या हवालदाराने त्याच्या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी अनिताचा चारित्र्याच्या संशयावरून व मोबाईलवर एका महिलेचा आलेला फोन का उचलला या कारणावरून तिला रहात्या घरी मारहाण करून तिचा गळा दाबून जिवे ठार मारून टाकले. याप्रकरणी पोलीस आरोपी मच्छिंद्र जाधवर (रा.वाणी प्लॉट) यास बार्शी न्यायालयात न्या.जे.आर.राऊत यांच्यासमोर उभे केले असता त्यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
ही घटना शुक्रवारी ९ फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास घडली़ याबाबत मयताचे वडील मुरलीधर काशीनाथ कराड (वय ६० रा.भालगाव ता.बाशी) यांनी बार्शी शहर पोलीसात तक्रार देताच आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, आरोपी सध्या बार्शी येथे वाणी प्लॉट येथे पत्नी मुलासह रहात आहे. तो वैराग पोलीस स्टेशन अंतर्गंत असलेल्या खांडवी औट पोस्ट येथे काम करीत आहे. तो नेहमीच तिला चारित्र्याच्या संशयावरून मारहाण करत होता.
दरम्यान, ही घटना घडण्यापुर्वी आरोपी घरी असताना व मुले मुली शाळेत गेलेली असताना त्याच्या मोबाईलवर एका महिलेचा फोन आला होता. तो मयत अनिता हीने उचलल्याचे त्याने पाहिले होते़ त्याचा राग आल्याने तु माझा फोन कां उचललास असे म्हणून तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यात तिच्या अंगावर काळे निळे वळ ओरखडे दिसत होते. त्यात तिचा गळा दाबल्याने जागीच मयत झाली.
शाळा सुटल्यानंतर फिर्यादीची नात प्रगती ही घरी आल्यानंतर तिच्या आईला रिक्षातून दवाखान्यात नेत असताना पाहिले दवाखान्यात ती मयत झाल्याचे सांगितले.त्यानंतर प्रगतीने हा सर्व प्रकार आजोबाना फोनवरून कळवताच त्यांनी दवाखान्यात येऊन पहाताच मुलगी मयत झाल्याचे दिसले. आरोपीस न्यायालयात उभे करताच १३ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.