शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांप्रमाणेच पोलिसांचा राज्याला अभिमान; तुमच्या चांगल्या घरांसाठी प्रयत्नशील राहणार: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 20:29 IST

पोलीस शिपायांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनापासून काम करुन कोरोना नियंत्रणासाठी दिले योगदान...

ठळक मुद्देवरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्याशी साधला संवाद

पुणे : माणुसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उत्तम कामामुळे पुणेपोलिसांप्रती नागरिकांचा आदर वाढला आहे. सैनिकांप्रमाणेच पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, असे गौरवोद्गार काढत पोलिसांना चांगली घरे मिळवून देण्यासाठी यापुढे निश्चितच प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन कालावधीत पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिका-यांशी संवाद साधला.  पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट देऊन पोलिसांची विचारपूस केली.

  लॉकडाऊन कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिसांच्या माहिती फलकाची पाहणी करुन केली. तसेच कोरोनाचा धैयार्ने सामना करत उत्कृष्ट काम केल्याबद्दल पवार यांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. या कालावधीत काम करताना फिजिकल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर याचा वापर करा, असे सांगितले. याप्रसंगी लॉकडाऊन कालावधीत चांगली कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे कामगिरीचे बनविण्यात आलेले 'फील द बिट' पुस्तिकेचे पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त डॉ.रवींंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग उपस्थित होते.
पवार म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी मागील ३ महिन्यांपासून राज्यातील पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत निरंतर काम करुन पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढेही शासनाच्या विविध आदेशांची अंमलबजावणी करुन कोरोनाला राज्यासह देशातून हद्दपार करुया, असे सांगून नागरिकांनी पुन्हा जोमाने उभे राहण्यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे.  पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम म्हणाले, लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलीसिंग, आऊटरिच, स्क्रिनिंग, कंटेन्मेंट झोन परिसरात कडक निर्बंध राबवण्याबरोबरच जनजागृती करण्यासाठी पोलीस शिपायांपासून ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मनापासून काम करुन कोरोना नियंत्रणासाठी योगदान दिले आहे.  डॉ. शिसवे यांनी लॉकडाऊन कालावधीत पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरणातून माहिती दिली.पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सोशल मीडिया चित्रफितीबाबत व जनजागृती पुस्तिकांबद्दल, तर पोलीस उपायुक्त  वीरेंद्र मिश्र यांनी पोलीस कल्याणकारी योजनांबाबत, तसेच पोलीस उपायुक्त  मितेश घट्टे यांनी क्वारंटाईन व ड्रोन द्वारे नियंत्रण बाबत तसेच अन्य परिमंडळ 1 ते 5 पोलीस उपयुक्तांनी त्यांच्या परिमंडळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली.  

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस