शेतकऱ्यांना लुटणारे आता आक्रमक होतायत; बच्चू कडूंचा भाजपला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 14:12 IST2019-12-18T14:10:49+5:302019-12-18T14:12:11+5:30
आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे.

शेतकऱ्यांना लुटणारे आता आक्रमक होतायत; बच्चू कडूंचा भाजपला टोला
नागपूर - शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीवर विरोधीपक्ष भाजप विधीमंडळात आक्रमक झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने आक्रमक पावित्रा घेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यावर उद्धव ठाकरे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील भाजपला टोला लागवला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकरी प्रश्नांवरून सभागृहाचे कामकाज थांबल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. तर जयंत पाटील यांनी देखील राज्याचे पैसे तुमच्या केंद्रातील मोदी सरकारला द्यायला सांगा, असं म्हटले.
दरम्यान शेतकऱ्यांना मागील पाच वर्षे लुटणारे भाजप आक्रमक झाल्याचे पाहून आमदार बच्चू कडू यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच शेतकऱ्यांना लुटणारे आक्रमक होताना पाहून आपल्याला आनंद झाल्याचे कडू यांनी नमूद केले. आता यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.