शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

प्लॅस्टिकच्या हद्दपारीला आजपासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:11 AM

राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

पुणे : राज्य सरकारने केलेल्या प्लॅस्टिकबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास शनिवारपासून सुरुवात होणार आहे. प्लॅस्टिक आढळल्यास दंड करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने आरोग्य निरीक्षक तसेच अन्य काही अधिकारी अशा तब्बल १७० जणांची फौजच तयार केली आहे.सर्वसामान्य नागरिक किंवा उत्पादक अशा कोणालाही आता या कायद्याचा भंग करता येणार नाही. तपासणीत सापडले, की थेट दंड करण्यात येणार असून त्यातून सुटका होणार नाही. सरकारची परवानगी नाही अशा सर्व उद्योग-व्यवसायांवरही प्लॅस्टिक वापराचा आरोप ठेवून कारवाई करण्यात येणार आहे.शहरी विभागात या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारने महापालिकेला दिली आहे. त्याची दखल घेऊन महापालिकेने आरोग्य विभागातील १७० आरोग्य निरीक्षक व सहायक आरोग्य निरीक्षक तयार केले आहेत. त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिक वापरावर लक्ष ठेवायचे आहे. पहिल्यांदा प्लॅस्टिक पिशवी वापरली तर ५ हजार, दुसऱ्या वेळी १० हजार रुपये दंड, तिसºया वेळी मात्र थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल. दुकानदार किंवा सामान्य नागरिक यांच्यासाठी समान दंड तसेच समान शिक्षा आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत एकूण ४२ टन प्लॅस्टिक जप्त केले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सुरेश जगताप यांनी दिली. १७० जणांची १७ पथके तयार करण्यात आली आहेत.याशिवाय सरकारची दोन पथके असतील. त्यांच्याकडून शहरात पाहणी केली जाईल. प्लॅस्टिकच्या पिशवीपासून ते कोणत्याही स्वरूपातील प्लॅस्टिक वापरताना आढळल्यास कारवाई केली जाईल़>कारवाई करावी लागणारमहापालिकेने नागरिकांनी त्यांच्याजवळ असलेले प्लॅस्टिक जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी केंद्रे सुरू केली होती. काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला, काही ठिकाणी नाही. आता न्यायालयाने दिलेली मुदत संपली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सरकारने महापालिकेला दिली आहे. त्यामुळे आता त्याचे काटेकोर पालन केले जाणार आहे. नागरिकांनी प्लॅस्टिकचा वापर टाळून महापालिकेला सहकार्य करावे.- मुक्ता टिळक,महापौर, पुणे महापालिका>सजावटीवर संक्रांतप्लॅस्टिकची फुले, सजावटीचे साहित्य, थर्माकोल याचा गणेशोत्सव किंवा सजावटीसाठी फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो; मात्र आता त्याचा वापर करून सजावट करता येणार नाही. थर्माकोलच्या उत्पादनावरच बंदी घालण्यात आली आहे.यांच्यासाठी आहे बंदीनिमसरकारी संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडासंकुल, चित्रपट, नाट्य गृहे, औद्योगिक घटक, सभारंभाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, हॉटेल, ढाबे, दुकानदार, मॉल, किरकोळ विक्रेते, समुद्र किंवा नदी किनारे, रेल्वे, सर्व सार्वजनिक ठिकाणे यांच्यासह सर्वसामान्यांसाठी बंदी आहे.याला आहे बंदीसर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्याप्लॅस्टिक किंवा थर्माकोलपासून तयार करण्यात येणारी ताटे, कप, प्लेट, काटे, वाट्या, चमचे,हॉटेलमधील अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणारी भांडी, स्ट्रॉ,द्रव पदार्थ साठविण्यासाठीच्या पिशव्या.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी