शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘खाकी’तील माणुसकीचे दर्शन,  हिंगोलीच्या डीवायएसपी अनिकेतच्या मुलीचे पालकत्व स्वीकारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 8:40 PM

पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व स्वीकारण्यास हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील पुढे आल्या आहेत.

सांगली : पोलिस कोठडीत खून झालेल्या मृत अनिकेत कोथळे याची तीन वर्षांची मुलगी प्रांजल हिचे पालकत्व स्वीकारण्यास हिंगोली येथील पोलिस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील पुढे आल्या आहेत. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च करण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. एकीकडे ‘खाकी’ वर्दीतील सैतानांनी अनिकेतचा खून केला; पण याच खार्की वर्दीतील सुजाता पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सुजाता पाटील यांनी लेखी पत्र देऊन पालकत्व स्वीकारण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती केली आहे. 

सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळेला लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळला होता. याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजण अटकेत आहेत. अनिकेतला प्रांजल ही तीन वर्षाची मुलगी आहे. पित्याचे छत्र हरपल्याने ती पोरकी झाली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक बिपीन बिहारी हे घटनेचा आढावा घेण्यास सांगलीत आले होते. त्यांनी कोथळे कुटुंबाच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी प्रांजलने तिची आई संध्याकडे ‘मम्मी हे कोण आहेत’, असा सवाल केला. त्यावर संध्या यांनी हे पोलिस आहेत, असे सांगताच ‘मम्मी’ हे आपल्या पप्पाला मारुन आले आहेत’, असा भाबडा सवाल केल्याने साºयांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. 

राज्य शासनाने कोथळे कुटुंबास दहा लाखांची मदत केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काही राजकीय नेते व सामाजिक संस्थांनी आर्थिक मदत केली. सांगलीतील गुलाबराव पाटील शैक्षणिक संस्थेने प्रांजलच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. आरोपींना अटक झाली. त्यांना शिक्षा होईल; पण अनिकेतचे कुटुंब व मुलीचे काय? त्यांनी जगायचं कसं? खाकी वर्दीतील युवराज कामटेच्या पथकाने केलेले कृत्य देशात कुठेही घडले नाही. त्याच्या या कृत्याने पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली. पोलिस दल प्रतिमा सुधारण्याचा खटाटोप करीत आहे. असे असताना हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्यास पुढाकार घेतला आहे. शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च त्या करणार आहेत. त्या कोथळे कुटुंबास भेटण्यासही सांगलीत येणार आहेत.खार्की वर्दीतील माणुसकीआसंगी तुर्क (ता. जत) येथे मार्च २००२ मध्ये शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सहाजणांना जिवंत जाळण्यात आले होते. या कुटुंबातील जगन्नाथ चव्हाण (वय १६) हा एकमेव मुलगा यामध्ये बचावला होता. संपूर्ण कुटुंब आगीत होरपळून मृत्यू पावल्याचे त्याने जवळून पाहिले होते. तो पोरका झाला होता. सांगलीचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. दिगंबर प्रधान यांनी जगन्नाथचे पालकत्व स्वीकारले होते. त्याच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा सर्व खर्च डॉ. प्रधान यांनी उचलला होता. अनिकेत कोथळेची ही घटना वेगळी आहे. खाकी वर्दीतील सैतानांनी त्याचा खून केला. पण याच खाकी वर्दीतील सुजाता पाटील यांनी माणुसकीचे दर्शन घडवित प्रांजलचे पालकत्व स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण