पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:10 IST2025-10-25T09:09:49+5:302025-10-25T09:10:34+5:30
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news:बदनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. तर बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता.

पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
साताऱ्यातील फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने हातावर पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचे लिहीत आत्महत्या केली होती. यामुळे पोलीस प्रशासनासह महाराष्ट्र हादरला असून या प्रकरणात फरार झालेला पीएसआय गोपाल बदने हा अद्याप फरारच असून पिडीता राहत असलेल्या घराचा मालक बनकर याला पोलिसांनी पहाटे अटक केली आहे.
बदनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. तर बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता. पोलिसांनी दोन पथके तयार करून या दोघांची शोधमोहिम सुरु केली होती. पहाटेच्या सुमारास बनकर हा एका फार्महाऊसवर लपला असल्याचे समजले. तेथून बनकरला अटक करण्यात आली.
गुरुवारी रात्री १० च्या सुमारास या महिला डॉक्टरने एका नामांकीत हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. तळहातावर गोपाल बदने याचे नाव लिहून त्याने चारवेळा बलात्कार केल्याचेही त्यात लिहिले होते. तसेच बनकर याचे नाव लिहून त्यानेही शारिरीक आणि मानसिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला होता. या आत्महत्येनंतर पोलीस प्रशासन, राजकारणी यांचे धाबे दणाणले होते. प्रकरण वाढल्याचे समजताच सातारा पोलिसांनी हालचाली सुरु केल्या होत्या. या महिला डॉक्टरवर मृतदेहांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणला जात होता. तिने विरोध केल्यानंतर खासदारांकडून देखील तिच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे आरोप पिडीतेच्या आतेभावाने केला आहे.