इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे आणि भडकलेल्या खजिन तेलाच्या किमतींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन केंद्र सरकारने आज पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये प्रत्येकी १० रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे शुद्ध धुळफेक असल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात समाज माध्यांवरून प्रतिक्रिया व्यक्त केली असून, केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यात त्यांनी लिहिले की, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्कात १० रुपयांची केलेली कपात म्हणजे शुद्ध धूळफेक आहे. ही कर कपात नागरिकांसाठी नव्हे, तर इंधनाचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी करण्यात आली आहे. या कर कपातीचा देशातील जनतेला काडीचाही फायदा होणार नाही, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
त्यांनी पुढे लिहिले की, चार राज्यांमध्ये होऊ घातलेला विधानसभा निवडणुकीमुळे सरकारने हा खेळ रचला आहे. अन्यथा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत ६०-७० डॉलर प्रतिबॅरल असताना, काँग्रेसच्या पुण्याईने इराण आणि रशियाकडून सर्वांत स्वस्त दरात कच्चे तेल मिळत असताना केंद्र सरकारने कर कमी केला असता. पण सरकारने स्वस्त इंधनाचा फायदा जनतेला न देता प्रचंड कर लावून जनतेची लूट सुरू ठेवली. मोदीजींच्या कृपेने त्यांच्या उद्योगपती मित्रांची नफेखोरी सुरू राहिली. आता युद्धजन्य परिस्थितीमुळे मोदीजींच्या उद्योगपती मित्रांना तोटा होत आहे, म्हणूनच या मित्रांच्या कंपन्यांवरील करात कपात करण्यात आली आहे, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला आहे.
Web Summary : Congress criticizes the central government's excise duty reduction on petrol and diesel as a mere eyewash, benefiting oil companies, not the public. Vijay Wadettiwar alleges the cut is a pre-election tactic favoring corporations.
Web Summary : कांग्रेस ने पेट्रोल और डीजल पर उत्पाद शुल्क में कटौती को दिखावा बताया, जिसका लाभ जनता को नहीं, तेल कंपनियों को होगा। विजय वडेट्टीवार ने आरोप लगाया कि यह कटौती चुनाव पूर्व रणनीति है, जो निगमों का समर्थन करती है।