Coronavirus: महिनाभरापूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कोरोना; कुटुंबीयांना आरोग्य विभागाचा फोन अन् म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 05:47 IST2021-05-19T05:46:19+5:302021-05-19T05:47:22+5:30

अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरात राहणारे डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे १४ एप्रिल रोजी कोरोनाचे उपचार सुरू असताना स्वाराती रुग्णालयात निधन झाले

A person who died a month ago got corona; The family was called by the health department | Coronavirus: महिनाभरापूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कोरोना; कुटुंबीयांना आरोग्य विभागाचा फोन अन् म्हणाले...

Coronavirus: महिनाभरापूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कोरोना; कुटुंबीयांना आरोग्य विभागाचा फोन अन् म्हणाले...

अविनाश मुडेगावकर 

अंबाजोगाई (जि. बीड) : येथील मंडी बाजार परिसरात राहणाऱ्या एका रुग्णाचे उपचार सुरू असताना महिनाभरापूर्वी कोरोनाने निधन झाले. या धक्क्यातून त्यांचे कुटुंबीय अद्याप बाहेर पडले नाहीत. तोच त्यांच्या कुटुंबीयांना रविवारी रुग्णालयातून फोन आला. धर्मेंद्र गुप्ता कोण आहेत? त्यांना  कोरोना झाला असून पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात पाठवा.  या फोनमुळे कुटुंबीय आश्चर्यचकीत तर झालेच पण या प्रकारामुळे आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला.  

अंबाजोगाई शहरातील मंडी बाजार परिसरात राहणारे डॉ. धर्मेंद्र गुप्ता यांचे १४ एप्रिल रोजी कोरोनाचे उपचार सुरू असताना स्वाराती रुग्णालयात निधन झाले. या घटनेला एक महिन्याच्या कालावधी लोटला. 

Web Title: A person who died a month ago got corona; The family was called by the health department