लोणार सरोवरातील पाणी उपशासाठी वन्यजीव विभागाची परवानगी घेणार; मुसळधार पावसामुळे पातळी २५ फुटांनी वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:54 IST2026-03-13T11:54:03+5:302026-03-13T11:54:16+5:30

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाणी पातळी वाढल्याने इथे असलेल्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही.

Permission from Wildlife Department to pump water from Lonar Lake will be sought; Level increased by 25 feet due to heavy rains | लोणार सरोवरातील पाणी उपशासाठी वन्यजीव विभागाची परवानगी घेणार; मुसळधार पावसामुळे पातळी २५ फुटांनी वाढली 

लोणार सरोवरातील पाणी उपशासाठी वन्यजीव विभागाची परवानगी घेणार; मुसळधार पावसामुळे पातळी २५ फुटांनी वाढली 

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची पाणी पातळी वाढल्याने इथे असलेल्या मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही. या सरोवरातील पाणी उपसा करण्यासाठी वन्यजीव विभागाची परवानगी आवश्यक असून त्यासाठी शुक्रवारी बैठक घेतली जाईल, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी विधानसभेत दिले.

बुलढाणा जिल्ह्यातील आमदार सिद्धार्थ खरात यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावर मंत्री नाईक म्हणाले की, यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने इथे मोठ्या प्रमाणात झरे मोकळे झाले. त्यामुळे लोणार सरोवराची पाणी पातळी २० ते २५ फूट वाढली. त्यामुळे मंदिरे दर्शनासाठी खुली नाहीत. यासंदर्भात तातडीने वन्यजीव विभागाची परवानगी घेण्याची कार्यवाही करणार आहोत.

१६८ कोटींचा खर्च

परिसर विकासासाठी लोणार सरोवराच्या विकासासाठी ४३४ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला असून त्यापैकी १६८ कोटी खर्च झाला आहे. या सरोवरातील पाणी गुलाबी झाले असून क्षारयुक्त पाणी आहे, सरोवराची निगराणी करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार तत्पर असून लवकरच त्याचे चांगले परिणाम दिसतील, असेही नाईक यांनी सांगितले.

आ. खरात आक्रमक

लोणार सरोवर व संवर्धन समितीमध्ये लोकप्रतिनिधी नसल्याबाबतही सिद्धार्थ खरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला मंत्री नाईक यांनी उत्तर दिले नाही आणि अध्यक्षांनी पुढील लक्षवेधी पुकारली. त्यामुळे मला बोलायला देत नाही, मला निलंबित करा, असा आक्रमक पवित्रा खरात यांनी घेतला. त्यानंतर या समितीत खरात यांचा समावेश करण्यासाठी शिफारस केली जाईल, असे नाईक यांनी सांगितले.

Web Title : लोनार झील से पानी निकालने के लिए वन्यजीव अनुमति ज़रूरी; स्तर 25 फीट ऊपर।

Web Summary : लोनार झील में जल स्तर बढ़ने से मंदिर पहुंच बाधित। वन मंत्री ने जल निकासी के लिए वन्यजीव अनुमति का आश्वासन दिया। विकास निधि आवंटित; समिति में जन प्रतिनिधि शामिल करने पर विचार।

Web Title : Lonar Lake water extraction needs wildlife permission; level up 25 feet.

Web Summary : Water level rise in Lonar Lake hinders temple access. Forest Minister assures wildlife permission for water extraction. Development funds allocated; public representative inclusion in committee considered.