शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

दोषी ठेकेदार कायमस्वरूपी हद्दपार

By admin | Updated: May 19, 2016 05:11 IST

नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीचा घोटाळा उघड झाल्यानंतर ठेकेदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पालिकेने निविदेच्या अटींमध्येच बदल केला आहे़

मुंबई : नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीचा घोटाळा उघड झाल्यानंतर ठेकेदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पालिकेने निविदेच्या अटींमध्येच बदल केला आहे़ त्यानुसार, दोषी ठेकेदारांची नोंदणी आता कायमस्वरूपी रद्द होणार आहे़ तसेच प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र जीओ टॅगिंगसह पालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे़गेल्या वर्षभरात पालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणणारे नालेसफाई व रस्ते घोटाळ्यांच्या चौकशी निविदा प्रक्रियेतच त्रुटी असल्याचे आढळून आले़ ठरावीक ठेकेदारांनाच कंत्राट मिळण्यासाठी वरिष्ठ पातळींवरूनच निविदेतील अटी बदलण्यात आल्या असल्याचे रस्ते घोटाळ्याच्या चौकशीतून उजेडात आले होते़ मात्र अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची तरतूदच निविदेत नाही़ त्यामुळे घोटाळेबाज ठेकेदार थातूरमातूर कारवाईनंतर पुन्हा निविदा प्रक्रियेत सामील होऊन नवीन कंत्राट मिळवीत आहेत़ नालेसफाई घोटाळ्यातील जबाबदार ठेकेदारांनी पालिकेच्या कारवाईवर न्यायालयातून स्थगिती आणली होती़ या घटनेनंतर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी ठेकेदारांना मदत करणाऱ्या अटी बदलण्यासाठी समिती नेमली होती़ (प्रतिनिधी)>अशा आहेत समितीच्या शिफारशी...उपायुक्त चंद्रशेखर चौरे यांच्या समितीने निविदा प्रक्रियेसाठी नियमावलीच तयार केली आहे़ त्यानुसार दोषी ठेकेदाराची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ तसेच ठेकेदारांमध्ये स्पर्धा वाढविण्यासाठी काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत़प्रकल्पाची माहिती जगजाहीर होणारएखाद्या कामासाठी निविदा मागविल्यानंतर तेथील सध्याची परस्थिती, काम सुरू असताना प्रत्येक टप्प्याचे छायाचित्र आणि काम संपल्यानंतर त्याचे छायाचित्र पालिकेच्या संकेतस्थळावरून जाहीर होणार आहे़ या छायाचित्रांसह प्रकल्पाची संपूर्ण माहितीही संकेतस्थळावर असेल़