जे लोक काल उड्या मारत होते...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सर्व चर्चा थोतांड ठरल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 14:19 IST2023-05-11T14:19:05+5:302023-05-11T14:19:49+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

जे लोक काल उड्या मारत होते...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितले सर्व चर्चा थोतांड ठरल्या
सर्वोच्च न्यायालयाने आज जो निकाल दिला आहे, क्या निकालामुळे आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.
जे लोक कालपर्यंत उड्या मारत होते की, आज सरकार जाणार त्यांच्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फेकले गेले आहे. ज्यांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या त्या सगळ्या चर्चा किती थोतांड होतं हे समोर आले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून त्यातुन उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन सरकार कायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले आहे, असे ते म्हणाले. शिंदे गटाला दिलासा देत १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे हे सरकार मजबुत व स्थिर असल्याचे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
राज्यपालांचे अधिकार व सुप्रीम कोर्ट हा त्यांचा विषय असून राजीनामा देण्याचे कारण काय होते? हे सरकार कायदेशीर असल्याचे बावनकुळेंनी म्हटले आहे.