'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:04 IST2025-12-26T17:02:57+5:302025-12-26T17:04:08+5:30
Harshvardhan Sapkal News: काही लोकांना काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, मंत्री आमदार खासदार सर्व पदे दिली पण त्यांची घुसमट होते म्हणून ते काँग्रेस पक्ष सोडून गेले. लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप आणि वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक
मुंबई - पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश हा काँग्रेसला बळ देणारा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. काही लोकांना काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, मंत्री आमदार खासदार सर्व पदे दिली पण त्यांची घुसमट होते म्हणून ते काँग्रेस पक्ष सोडून गेले. लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप आणि वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा व काँग्रेस पक्ष या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकीय पक्ष हे विचारधारेवर काम करत असतात आणि काँग्रेस पक्ष ही वैचारिक लढाई निष्ठेने व निकराने लढत आहे. पण आज काही पक्ष हे केवळ सत्ता व सत्तेतून भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवणे व त्या पैशातून निवडणुका जिंकणे हे काम करत आहेत. पैसा फेक व तमाशा देख हे वगनाट्य जोरात सुरु आहे. काँग्रेसची विचारधारा देशाला तारणारी आहे आणि प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसच्या प्रशांत महासागरात प्रवेश केला आहे, त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत आहे.
काँग्रेस पक्षाला विचारांचा वारसा आहे, समता, बंधुता, सामाजिक न्याय या मुल्यांसाठी काँग्रेसचा लढा आहे. तर दुसरीकडे जातीवादी मनुवादी विचाराचा भाजपा पक्ष आहे. भाजपाची भूमिका ही केवळ मूठभर लोकांच्या हाती राजसत्ता व धर्मसत्ता असावी अशी आहे. काही लोकांना काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री, मंत्री आमदार खासदार सर्व पदे दिली पण त्यांची घुसमट होते म्हणून ते काँग्रेस पक्ष सोडून गेले. लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप आणि वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.