सलाम! ५ महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार; चिमुकल्या जीवासाठी १६ कोटींचे महादान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 08:48 AM2021-05-08T08:48:15+5:302021-05-08T08:51:46+5:30

अत्यंत दुर्मिळ आजारावर १६ कोटींचे इंजेक्शन देऊन यशस्वी उपचार करण्यात आले.

people donate rs 16 crore for five month child who needs most expensive drug | सलाम! ५ महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार; चिमुकल्या जीवासाठी १६ कोटींचे महादान

सलाम! ५ महिन्यांच्या बाळावर यशस्वी उपचार; चिमुकल्या जीवासाठी १६ कोटींचे महादान

Next
ठळक मुद्दे५ महिन्यांच्या चिमुकल्यावर मुंबईत यशस्वी उपचारदुर्मिळ आजारासाठी तब्बल १६ कोटींचे इंजेक्शनकेवळ ४२ दिवसांत तब्बल २.६ लाख लोकांचे महादान

मुंबई: एका पाच महिन्याच्या बाळाला झालेल्या दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी मोठ्या मदतीची अत्यंत आवश्यकता होती. बाळाच्या पालकांनी समाजाला आवाहन केले आणि सामाजिक बांधिलकी जपत तब्बल १६ कोटींचे महादान करण्यात आले. गुजरातमधील एका छोट्या गावात राहणाऱ्या चिमुकल्याला दुर्मिळ आजार झाल्याचे समोर आले. त्यानंतर या बाळावर मुंबईमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले. (people donate rs 16 crore for five month child who needs most expensive drug)

मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात या चिमुकल्याला झालेल्या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले. डॉ. निलू देसाई यांनी सांगितले की, पाच महिन्याच्या चिमुकल्याला पाठीच्या कण्याचा दुर्मिळ जनुकीय आजार झाला होता. ८ ते १० हजार मुलांमध्ये क्वचितच असा आजार आढळतो. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास ते बाळासाठी धोकादायक ठरले असते, असे त्या म्हणाल्या. क्राऊडफंडिगच्या माध्यमातून केवळ ४२ दिवसांत तब्बल २.६ लाख लोकांनी आपल्याला शक्य तेवढी मदत केली आणि १६ कोटी रुपये जमा झाले. १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन या बाळाला देण्यात आले. 

क्या बात! ४ वेळा कोरोनावर मात; दोनदा प्लाझ्मादान, कोरोना वॉरियरची कौतुकास्पद कामगिरी

पाठीच्या कण्याच्या स्नायूशी संबधित आजार

राजदीपसिंह राठोड आणि जिनलबा या दाम्पत्याच्या ५ महिन्यांच्या धैर्यराजसिंह राठोड या चिमुकल्याला हा दुर्मिळ आजार झाला होता. या चिमुकल्याला स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी नामक आजार झाला होता. या आजारात पाठीच्या कण्यातील पेशींची झीज झाल्याने स्नायूंवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे स्नायू कमकुवत होऊन श्वसनाचा त्रास होतो. तसेच अवयवांच्या हालचालींवरही परिणाम होतो. स्वीडनमधील एका कंपनीकडून एक इंजेक्शन तयार केले जाते. जगातील सर्वांत महागड्या औषधामध्ये या इंजेक्शनचा समावेश होतो. 

...तर कोरोना रुग्णांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका; टास्क फोर्स प्रमुखांकडून खबरदारीचा इशारा

देश, परदेशातून मदत

राजदीपसिंह राठोड म्हणाले की, मुलाच्या जन्मानंतर महिन्याभराने तो हातपाय हालवू शकत नसल्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यांनी या दुर्मीळ आजाराचे निदान केले. मात्र, उपचारांसाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा खर्च अवाक्याबाहेरचा असल्याने मदत गोळा करण्यास सुरुवात केली. मार्चमध्ये या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. भारतात हे इंजेक्शन आयात करावे लागत असून, भारतातील त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे. मात्र, देशातील आणि परदेशातील अनेकविध मंडळींनी शक्य ती मदत केल्यामुळे आमच्या बाळावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले, अशी कृतज्ञता राठोड यांनी व्यक्त केली. 

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: people donate rs 16 crore for five month child who needs most expensive drug

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app