लोणावळ्यात हॉटेल व्यावसायकाला ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न दिल्याने दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 16:16 IST2017-11-12T16:10:08+5:302017-11-12T16:16:05+5:30
वारंवार सुचना व माहिती देऊनही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न देणार्या एका हॉटेल व्यावसायकावर शनिवारी लोणावळा नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली. पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कंबर कसली असून नागरिकांनी देखिल यामध्ये मोठा सहभाग दिला आहे.

लोणावळ्यात हॉटेल व्यावसायकाला ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न दिल्याने दंड
लोणावळा : वारंवार सुचना व माहिती देऊनही ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन न देणार्या एका हॉटेल व्यावसायकावर शनिवारी लोणावळा नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केली. पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेले लोणावळा शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेने कंबर कसली असून नागरिकांनी देखिल यामध्ये मोठा सहभाग दिला आहे.
2018 मध्ये देशभरात होणार्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये लोणावळा शहराला मानांकन मिळावे याकरिता शहरात सर्वत्र स्वच्छतेबाबत जनजागृती, लोकसहभागातून परिसराची स्वच्छता, स्वच्छतागृहांची देखरेख, शाळांमध्ये प्रबोधन, गावठाण भाग व सोसायट्यांमध्ये प्रबोधन, शहरात कोठेही कचर्यांचे ढिग, घाण, सांडपाण्याचे प्रवाह दिसणार नाही याकरिता टिम कार्य करत आहे.
सोबतच नागरिकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन द्यावा यासाठी विविध माध्यमातून जनजागृती सुरु असताना देखिल जे नागरिक व व्यावसायीक कचरा वर्गीकरण करुन देत नाहीत त्यांच्यावर लोणावळा नगरपरिषदेने आता दंडात्मक कारवाई मोहिम सुरु केली आहे.
तुंगार्ली येथिल ईम्परिअल ग्रॅन्ड या हॉटेलवर शनिवारी पहिली दंडात्मक कारवाई करत पाचशे रुपये दंड वसुल करण्यात आला. नागरिकांनी शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्यासोबत निर्माण झालेला कचरा हा ओला व सुका असा वर्गीकृत करुन देणे अपेक्षित आहे.
आपला परिसर व शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे मात्र वारंवार सुचना करुन देखिल जर कोणी कचरा वेगळा करुन देत नसल्याने त्यांच्यावर देखिल अशीच कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.