लहान बजेटमध्ये पर्यटनासाठी पुणे-मुंबईजवळ चांगले स्पॉट शोधत असाल तर हे वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2017 10:00 AM2017-11-04T10:00:00+5:302017-11-04T10:00:00+5:30

दिवाळी व्हॅकेशन तर आत्ताच संपलंय पण दोनच आठवड्यात पुन्हा बोअर झालात तर हे पर्यटनाचे पर्याय नक्की ट्राय करा.

here are awesome tourist spots near mumbai pune for small budget | लहान बजेटमध्ये पर्यटनासाठी पुणे-मुंबईजवळ चांगले स्पॉट शोधत असाल तर हे वाचा.

लहान बजेटमध्ये पर्यटनासाठी पुणे-मुंबईजवळ चांगले स्पॉट शोधत असाल तर हे वाचा.

Next
ठळक मुद्दे विकेंडमध्ये कुठेतरी जाण्याचा प्लँन करताय पण बजेट कमी आहे.आपल्याकडे असलेल्या तुटपूंज्या बजेटमध्ये म्हणजे अगदी दोन ते चार हजारात तुम्ही विकेंड प्लॅन करु शकता.दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरचा विकेंड इकडे प्लॅन करा.

मुंबई : विकेंडमध्ये कुठेतरी जाण्याचा प्लँन करताय पण बजेट कमी आहे मात्र तरीही छान रिफ्रेशमेंट ट्रीप करायची असेल तर आम्ही तुम्हाला काही ऑप्शन सांगणार आहोत. आपल्याकडे असलेल्या तुटपूंज्या बजेटमध्ये म्हणजे अगदी दोन ते चार हजारात तुम्ही पुण्यानजदीकच्या या ठिकाणांना जाऊन येऊ शकाल.

वेल्हे

पुण्यापासून अगदी ४६ किलोमीटर अंतरावर असलेलं वेल्हे हा विकेंडसाठी उत्तम ऑप्शन आहे. घाईगडबडीच्या आयुष्यातून थोडसं रिलँक्स होण्यासाठी वेल्हे हा सर्वात चांगला पर्याय आहे. चहुबाजूंना पसरलेली हिरवळ तुमचं मन मोहून घेते आणि क्षणार्धात सगळा क्षीण नाहिसा करते. अवघ्या २ हजार ते ३ हजारांत तुम्ही येथे जाऊन येऊ शकता. 

भोर

पुण्यापासून अवघ्या ५४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भोर या गावात तुम्ही ग्रुप कँम्पनींग करू शकता. इथली थंड हवा आपल्याला प्रसन्न करते. इकडचं निसर्ग सौंदर्य तुम्ही अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये पाहिलं असेलच. त्याचप्रमाणे फोटोग्राफी, सायलिंग, स्कायवॉल्क, फुटबॉल, ट्रेकिंग, क्रिकेट, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांचा आणि मनोरंजानाचा आनंद घेऊ शकता. भोरमध्येच भातनगर धबधबा, काळूबाई मंदिर आहेत. त्यामुळे तुम्ही तिथेही जाऊ शकता. भोरमध्ये तुम्ही अवघ्या २००० रुपयात जाऊन येऊ शकता. 

लोणावळा

लोणावळ्याविषयी तुम्हाला अधिक काही सांगायची गरजच नाही. मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या या घाटात कित्येकजण येतच असतात. आजूबाजूला पसरलेल्या डोंगराळ प्रदेशामुळे आपण आपला थकवा दूर करतो. कार्ला लेणी, लायन्स पॉईंट, लोहगड किल्ला आणि भाजा लेणीही लोणावळ्यात पहायला मिळतात. अगदी दीड ते तीन हजारात तुम्ही येथे मनसोक्त फिरू शकता.

खोपोली

मुंबईहून पुण्यात जाताना लोणावळ्याच्या आधी लागणारं शहर म्हणजे खोपोली. खोपोलीत मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत. डोंगरांच्या आडून कोसळणाऱ्या धबधब्यांचं चित्रण फार सुरेख आहे. पण पावसाळ्यातच या ठिकाणी फार मजा आहे. 

पांचगणी

खऱ्या अर्थाने निसर्ग सौंदऱ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा पांचगणीला नक्की भेट द्या. चहुबाजूंनी पसरेला हिरवा परिसर पाहून आपल्याला सुखद धक्काच बसतो. निसर्गाने या शहरात एक वेगळीच उधळण केल्याचं पहायला मिळतं. पुण्यापासून पांचगणी ९९ किलोमीटर अंतरावर आहे. केवळ २ हजारात तुम्ही येथे मनसोक्त आनंद घेऊ शकता.

कास पठार

विविध फुला-फळांनी फुललेलं हे साताऱ्यातील कास पठार नेहमीच उल्हासित करत असतं. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. कास पठाराविषयी माहिती सांगणारे अनेक व्हिडिओही युट्यूबवर उपलब्ध आहेत. पुण्यापासून थोडं लांब १३६ किलोमीटर असलं तरी एवढ्या लांबचा प्रवास करून येथे दोन मिनीटं उभं राहिलं तरी सगळा शीण कुठच्या कुठे पळून जातो. निसर्गाचं वरदान लाभलेलं हे कासपठार म्हणजे महाराष्ट्रातील स्वर्ग आहे असंही काहीजण म्हणतात. कास पठाराच्या आजूबाजूला ठोसेघर धबधबा, चाळकेवाडी पवनचक्की, सज्जनगड किल्ला असे अनेक विभाग पाहण्यासारखे आहेत. पुण्यापासून या कास पठारावर जाण्यासाठी फक्त दीड ते तीन हजार खर्च येऊ शकतो. 

भंडारदरा धरण

सगळ्यात प्रसिद्ध धरण म्हणून ओळख असलेलं भंडारदरा धरण. भंडारदऱ्यातील निळाशार पाण्यावर जेव्हा सुर्यप्रकाश पडतो आणि जेव्हा उचंच उंच गेलेल्या डोंगररांगा आकाशा टेकताना दिसतात तेव्हा आपल्याला स्वर्गात आल्याचाच भास होतो. या शहराच्या आजूबाजूला अम्ब्रेला धबधबा, हरिश्चचंद्र आणि पवनगडही आहेत. पुण्यापासून भंडारदरा १६१ किलोमीटर असून पुण्यापासून जाणार असाल तर हजार-दोन हजारात तुमची ही मस्त ट्रीप होऊ शकेल.

आत्ताच दिवाळीच्या सुट्ट्या तुम्ही आनंदात घालवल्या असतीलच पण दोन-तीन आठवड्यात पुन्हा तोच-तोचपणा जाणवला तर हे पर्याय नक्की आजमावून पाहा.

Web Title: here are awesome tourist spots near mumbai pune for small budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.