शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांना १३ हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 6:18 AM

‘अति घाई संकटात नेई’ असा संदेश देत वाहतूक पोलिसांकडून वेगमर्यादेचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. मात्र ‘अतिघाईमुळे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संकटात आले आहेत.

मुंबई - ‘अति घाई संकटात नेई’ असा संदेश देत वाहतूक पोलिसांकडून वेगमर्यादेचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात येते. मात्र ‘अतिघाईमुळे’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संकटात आले आहेत. मुख्यमंत्री वापरत असलेल्या वाहनांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलानच्या माध्यमातून एकूण १३ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, हा दंड अद्याप ‘पेंडिंग’ असल्याचे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केलेल्या दाव्यानुसार, जानेवारी ते मे २०१८ या काळात मुख्यमंत्र्यांच्या वाहन क्रमांक एमएच-०१-सीपी-००३७ आणि एमएच-०१-सीपी-००३८ या दोन्ही वाहनांवर वांद्रे-वरळी सागरी सेतूवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे ई-चलानच्या माध्यमाने दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वाहनचालकांकडून दंडाची रक्कम कोण वसूल करणार? मुंबई पोलीस ट्रॅफिक अ‍ॅपनुसार आतापर्यंत दंडाची १३ हजार रुपयांची रक्कम ‘पेंडिंग’ आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर दंडाची थकबाकी भरत नाहीत, तर सामान्य जनतेने तरी तो का भरायचा, असा सवाल उपस्थित करत थकबाकीच्या वसुलीसाठी ठोस कारवाई करण्याची मागणी अहमद यांनी केली.पोलिसांची ‘चुप्पी’प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या माहितीनुसार, २२ डिसेंबर २०१६ रोजी ‘एमएच-०१-सीपी-००३८’ या क्रमांकाचे वाहन भायखळा पोलीस उपायुक्त यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.एमटीपी अ‍ॅपनुसार, या वाहन क्रमांकांच्या वाहनचालकाने तब्बल ८ वेळा वांद्रे-वरळी सेतूवर वेगमर्यादेचे उल्लंघन केले. याबाबत मुंबई पोलिसांशी संपर्क साधला असता ‘आॅन रेकॉर्ड’ बोलण्यास अधिकारी तयार नाहीत.वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी शहरात तब्बल ४ हजारांहून जास्त सीसीटीव्हींचे जाळे उभारले आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतूसह शहरातील मुख्य रस्त्यांचा समावेश या सीसीटीव्हींमध्ये आहे. एकीकडे रस्ता सुरक्षा सप्ताहाबाबत उपाय राबवायचे आणि दुसरीकडे राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींकडून रस्ता सुरक्षेची पायमल्ली होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्र