शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पेण अर्बन बँक अखेर दिवाळखोरीत

By admin | Updated: May 11, 2014 00:27 IST

पेणसह रायगडातील उरण, पनवेल, खालापूर, कर्जत, पाली, सुधागड व अलिबाग या सात तालुक्यांबरोबरच मुंबईतील दादर, गिरगाव, विलेपार्ले येथील १८ शाखांचा विस्तार असलेली पेण अर्बन सहकारी बँक आता इतिहासजमा झाली आहे.

पेण : पेणसह रायगडातील उरण, पनवेल, खालापूर, कर्जत, पाली, सुधागड व अलिबाग या सात तालुक्यांबरोबरच मुंबईतील दादर, गिरगाव, विलेपार्ले येथील १८ शाखांचा विस्तार असलेली पेण अर्बन सहकारी बँक आता इतिहासजमा झाली आहे. एक लाख ९८ हजार ठेवीदार व त्यांच्या ७00 कोटींच्या ठेवी कायमच्या बुडाल्या असून राज्य शासनाचे सहकार आयुक्त मधुकर चौधरी यांनी शासकीय सेवेतून नवृत्ती स्वीकारण्याच्या एक दिवस अगोदर २९ एप्रिल २0१४ रोजी पेण अर्बन सहकारी को-ऑप. बँकेच्या दिवाळखोरीवर शिक्कामोर्तब केले आहे. 
महाराष्ट्र सहकारी सोसायटी कायदा कलम ११0 (अ) अंतर्गत पेण अर्बनचा अध्याय समाप्त करून बँक दिवाळखोरीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे सुमारे दोन लाख ठेवीदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पेण अर्बनचा ७५ वष्रे वैभवशाली प्रवास सुरू होता. मात्र, २३ सप्टेंबर २0१0 पासून त्यास आर्थिक गैरव्यवहाराचा बट्टा लागला. पेण अर्बनला याच दिवशी रिझर्व्ह बँकेने टाळे लावून आर्थिक व्यवहारावर निर्बंध लादले. ठेवीदारांची धावपळ उडाली. पैसे मिळणे बंद झाले. त्यानंतर, ९ फेब्रुवारी २0१२ रोजी पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेने बडगा उगारून बँकेचे आर्थिक व्यवहाराचे लायसन्स जप्त केले. त्याच वेळी बँक बुडणार, हे स्पष्ट होते. बँकेचा गैरव्यवहार ७५0 ते ८00 कोटींचा असून यातील बेनामी कर्ज प्रकरणे व घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष शिशिर धारकर, २४ संचालक, १८ कर्मचारी अशा ४३ जणांवर आरोपपत्र ठेवून त्यांना जेलची हवा खावी लागली होती. आता हे सर्व जण जामिनावर सुटून बाहेर आहेत.
 पेण अर्बनशी संलग्न असा दुसरा मोठा आर्थिक गैरव्यवहार म्हणजे १२00 कोटींच्या फ्रॉडमध्ये सीबीआयने शिशिर धारकरसह पत्नी व तीन संचालकांना केलेली अटक. सामान्य ठेवीदारांच्या ठेवींवर एवढे मोठे महाभारत घडले, ते तब्बल साडेतीन वर्षांहून अधिक काळ चर्चेत राहिले आणि अखेर ते सहकार आयुक्तांच्या निर्णयाने संपलेदेखील.  
पेण अर्बनच्या एक लाखाच्या आतील खातेदारांची संख्या तब्बल १ लाख ७८ हजार ६६५ असून खातेदारांच्या ठेवीच्या एकूण रकमेची आकडेवारी १९६ कोटी ८४ लाख ८७ हजार इतकी आहे. एक लाखापेक्षा मोठय़ा ठेवी असणारे खातेदार  १४ हजार ९७६ असून त्यांच्या ठेवींची एकूण रक्कम ४३६ कोटी १ 
लाख १५ हजार आहे. या दिवाळीखोरीचा मोठा आर्थिक फटका १४ हजार ९७६ ठेवीदारांना बसणार असून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये वाटप होतील. त्यांच्या ४३६ कोटींपैकी १४९ कोटी रुपयेच त्यांना मिळणार असून त्यांच्या स्वकष्टाच्या २८७ कोटींच्या ठेवीवर पाणी सोडावे लागणार आहे.
 
१३ मे रोजी मोर्चा
पेण अर्बन संघर्ष समितीद्वारे १३ मे रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवीदारांचा फॅमिली मोर्चा आहे. लोकसभा निवडणूक संपताना अवघ्या पाच दिवसांनंतर पेण अर्बन लिक्विडेशनमध्ये काढण्याचा शासनाच्या सहकार खात्याचा निर्णय सर्वांनाच अचंबित करणारा आहे. निवडणूक प्रचारात ठेवीदारांच्या मतांसाठी राजकारण करणारे नेते आता कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.