शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना श्रद्धांजली काय वाहता, परिवर्तन घडवा!

By admin | Updated: October 26, 2015 02:48 IST

उत्पादन खर्चाच्या तुलनेत न मिळणारा भाव, नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांच्या गर्तेत कापूस उत्पादक अडकला आहे. त्यातून आत्महत्या होतात

जळगाव : उत्पादन खर्चाच्या तुलनेत न मिळणारा भाव, नैसर्गिक आपत्ती अशा समस्यांच्या गर्तेत कापूस उत्पादक अडकला आहे. त्यातून आत्महत्या होतात. आपण श्रद्धांजली वाहण्याची जबाबदारी पार पडतो. पण ही श्रद्धांजली वाहण्याऐवजी कापूस क्षेत्रातील सर्व उद्योजक, शास्त्रज्ञ यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी विश्वसनीय, ठोस काम करायला हवे. मूल्यवर्धनावर भर द्यायला हवा, असे आवाहन मुंबई येथील कोटक ग्रुपचे सर्वेसर्वा तथा जागतिक कापूस बाजारपेठेचे अभ्यासक सुरेश कोटक यांनी केले.जैन हिल्सवरील गांधी तीर्थवरील सभागृहात रविवारी महाकॉट संमेलन झाले. कपाशीच्या तंत्रज्ञानाबाबत आपण मागे असल्याने उत्पादकताही कमी आहे. थ्री जीएम (जेनेटीकली मॉडीफाईड) तंत्र अजून नाही. देशाची कापूस उत्पादकता ३०० ते ४०० किलो रुई प्रतिहेक्टरवर अडकली आहे. चीनने यंदा १,५०० किलो रुई प्रतिहेक्टरी उत्पादकता गाठण्याचे ठरविले आहे. त्याचा विचार देशातील शास्त्रज्ञ, शासन व इतर संस्थांनी करावा. आपल्याकडे कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते; पण उत्पादन येत नाही. दुसरीकडे इतर देशांमध्ये लागवड कमी क्षेत्रावर होते, पण उत्पादनात ते भारताला मागे टाकण्याची स्पर्धा करतात, असेही कोटक म्हणाले. गुजरातने शंकर हा रुईचा ब्रॅण्ड विकसित केला आहे. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आफ्रिकेतील देशांच्या तुलनेत भारतातील रुई स्वस्त केली आहे. ब्रॅण्डींग करताना आपल्या रुईचे दर आपल्या मागे असलेल्या देशांमधील रुईच्या तुलनेत अधिक हवेत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.