Pawar factor in BJP ShivSena regime | भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षातही पवार 'फॅक्टर'
भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षातही पवार 'फॅक्टर'

मुंबई : सरकार स्थापनेवरून भाजप-शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या दोन्ही पक्षाकडून दबावतंत्राचा वापर करताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांच्या पर्यायाची भीती एकमेकांना दाखवली जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेतही पवार फॅक्टरचं महत्वाचा ठरत असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेचं विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसनेने एकमेकाला टाळी देत पुन्हा युती करून निवडणूक लढवली. मात्र आता हेच दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकमेकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहे. भाजप-शिवसेनेकडून आपल्या समोर अनेक पर्याय उपलब्ध असल्याची भीती एकमेकांना दाखवली जात आहे. मात्र यासाठी दोन्ही पक्ष शरद पवारांच्या नावाचा वापर करताना दिसत आहे.

शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून भाजपवर टीका तर पवारांवर स्तुतिसुमने उधळणे सुरु असल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाची मागणी होत असून भाजपला मात्र हे मान्य नाही. त्यामुळे भाजपवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून पवारांच्या नावाचा वापर करून पर्याय असल्याचा दाखवले जात आहे.

तर दुसरीकडे भाजपकडून सुद्धा आमच्याकडे पवार फॉर्म्युला असल्याचा दाखवले जात आहे. त्यामुळेच भाजपच्या गोटातून शरद पावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली असल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र भाजप-शिवसेनेकडून सुरु असलेल्या दबावतंत्राच्या खेळीत पवारांचा नावाचा वापर हुकमाचा एक्कासारखं केला जात आहे. त्यामुळे सत्तास्थापनेतही पवार फॅक्टरचं चर्चेत आले असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title: Pawar factor in BJP ShivSena regime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.