BREAKING: नाशिकमध्ये 'पवन एक्स्प्रेस'चे १२ डबे रुळावरुन घसरले, घटनास्थळावर बचाव कार्य सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 16:50 IST2022-04-03T16:49:59+5:302022-04-03T16:50:46+5:30
नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे १९ पैकी १२ डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली आहे. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

BREAKING: नाशिकमध्ये 'पवन एक्स्प्रेस'चे १२ डबे रुळावरुन घसरले, घटनास्थळावर बचाव कार्य सुरू
नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे १९ पैकी १२ डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी घडली आहे. देवळाली-लहवीत दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच वैद्यकीय पथक देखील घटनास्थळावर पोहोचलं असून बचाव कार्य सुरू आहे.
Visuals of derailed coaches of 11061 LTT-Jaynagar Express between Lahavit and Devlali (near Nashik) on Dn line at around 15.10 hrs today Accident relief train and medical van rushed to the spot. Details awaited: Central railway CPRO pic.twitter.com/nXA0hvTw0I
— ANI (@ANI) April 3, 2022
रेल्वे क्रमांक ११०६१ पवन एक्स्प्रेस ही मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून (LTT) जयनगर (बिहार) येथे जात होती. दरम्यान नाशिक जवळील देवळाली येथे दुपारी तीन वाजून १० मिनिटांच्या सुमारास रेल्वेचे काही डबे घसरल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वेकडून प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती कुटुंबीयांपर्यंत पोहोचावी यासाठी 0253-2465816 (नाशिक) हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. तर मुंबईतील सीएसएमटीच्या टीसी ऑफीसकडूनही MTNL: 02222694040 हा क्रमांक जारी करण्यात आला आहे.
1. Public helpline at Nashik 0253-2465816
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 3, 2022