मोबाइल तपासल्याने पतीची पत्नीला मारहाण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:51 IST2018-03-27T22:49:18+5:302018-03-27T22:51:30+5:30
नाशिक : मोबाइलमधील आपला डाटा दुसऱ्या कोणालाही सहजासहजी पाहता येऊ नये यासाठी मोबाइलमध्ये लॉक कोड, पॅटर्न कोड अशा सुविधा आहेत़ मात्र, हा प्रकार झाला दुस-यांबाबत मात्र आपल्याच पतीचा मोबाइल तपासणे सिडकोतील एका विवाहितेला चांगलेच महागात पडले असून, या पतीने संतापाच्या भरात पत्नीला मारहाण तर केलीच शिवाय मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे़

मोबाइल तपासल्याने पतीची पत्नीला मारहाण !
नाशिक : मोबाइलमधील आपला डाटा दुसऱ्या कोणालाही सहजासहजी पाहता येऊ नये यासाठी मोबाइलमध्ये लॉक कोड, पॅटर्न कोड अशा सुविधा आहेत़ मात्र, हा प्रकार झाला दुस-यांबाबत मात्र आपल्याच पतीचा मोबाइल तपासणे सिडकोतील एका विवाहितेला चांगलेच महागात पडले असून, या पतीने संतापाच्या भरात पत्नीला मारहाण तर केलीच शिवाय मारून टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे़
अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड परिसरातील दातीरनगरच्या मारुती संकुलमध्ये पंचरत्न रेसिडेन्सी आहे़ यामधील २३ नंबरच्या फ्लॅटमध्ये संतोष जगन्नाथ जेऊ घाले (२८) हे पत्नी मंजुषा (२३), मुलासह राहतात़ शुक्रवारी (दि़२३) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पत्नी मंजूषा ही आपला मोबाइल तपासत असल्याचे संतोष जेऊघाले याने बघितले व त्याचा संताप अनावर झाला़ यानंतर संतोषने पत्नीला बेदम मारहाण तर केलीच शिवाय घरातील लाकडी दांडका घेऊन मारण्यासाठी धावला़ यामुळे पत्नी मंजूषा जिवाच्या आकांताने पुढे पळत असताना पती संतोष हा लाकडी दांडका घेऊन तुला आज मारून टाकतो, अशी धमकी देत होता़
या प्रकरणी मंजूषा जेऊघाले या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित संतोष जेऊघाले विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़