शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

हर्षवर्धन पाटील सोडणार काँग्रेसची साथ? अकलूजमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 12:23 IST

आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटलांनी विजयसिंह मोहिते-पाटील याचा घेतला निरोप

ठळक मुद्दे- काँग्रेसचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर- विजयसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय खेळी यशस्वी ठरतेय- काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा राजकीय हादरा

अकलुज : माजी सहकार राज्यमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर असुन आज इंदापुरातील कार्यकर्त्याच्या मेळाव्यापुर्वी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांची शिवरत्न बंगल्यावर भेट घेवुन गुप्त चर्चा केली. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला मोठा राजकीय हादरा बसत आहे.  

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे निकटवर्तीय असलेले माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत. आज बुधवार ४ सप्टेंबर रोजी कार्यकर्त्याशी चर्चा करण्यासाठी त्यांनी इंदापुर येथे बैठक बोलावली आहे. तत्पुर्वी अकलूज येथे येऊन माजी खा. विजयदादा यांची भेट घेतली. उभय नेत्यांची बंद खोलीत सुमारे तासभर चर्चा झाली आहे. त्यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील, अकलूजचे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही उपस्थित होते.

भेटीनंतर आजच निर्णय घेतो असे सांगून हर्षवर्धन पाटील बावड्याकडे रवाना झाले. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यामुळे कॉग्रेस राष्ट्रवादीला मोठे राजकीय धक्के मिळत असुन आता पुणे जिल्ह्यातील राजकीय वजनदार असणारे हर्षवर्धन पाटील यांनाही भाजपात आणण्यासाठी विजयसिंह मोहिते - पाटलांची राजकीय खेळी यशस्वी ठरत आहे.-----------राष्ट्रवादीच्या कुरघोड्यांना कंटाळलो...राज्यात कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची आघाडी आहे, परंतु राष्ट्रवादीकडुन सतत कुरघोडीचे राजकारण केले जात आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला इंदापुर तालुक्यातुन मताधिक्य मिळवुन देवुनही राष्ट्रवादीचे कुरघोडीचे राजकारण सुरुच असुन त्याला कंटाळून राजकीय निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे, तत्पुर्वी विजयदादांशी चर्चा करण्यासाठी आलो असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले़  

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलIndapurइंदापूरindapur-acइंदापूरBJPभाजपाcongressकाँग्रेस