शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
2
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
3
जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या
4
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
5
तीन सरकारी बस एकमेकांवर घडकल्या, ४० हून अधिक प्रवासी जखमी, अनेकांची प्रकृती चिंताजनक  
6
सौदी अरेबियानं लढवली शक्कल, पाकिस्तानला कळलंच नाही; 'डिफेन्स डील'मागची Inside Story काय?
7
आजीच्या जिद्दीला सलाम ! ७१ वर्षांच्या महिलेने चक्क १३,००० फूटांवरून केलं 'स्कायडायव्हिंग'
8
'१-२ जागा कमी जास्त चालतील, पण...', बिहार निवडणुकीबाबत चिराग पासवान यांचे मोठे वक्तव्य
9
भूषण प्रधान आणि केतकीने लग्नाआधीच दिली गुडन्यूज? अभिनेत्याच्या पोस्टने चर्चेला उधाण
10
Video - "मी मुस्लिम, पण मला हा रंग आवडतो"; 'भगवा आयफोन' खरेदी केल्याचा प्रचंड आनंद
11
खळबळजनक! गोड बोलला, खांद्यावर हात ठेवला अन् गळा चिरला; नवऱ्याचा बायकोवर जीवघेणा हल्ला
12
काकासोबत असलेल्या प्रशिकवर बिबट्याची झडप, घरापासून ५० मीटरवर सापडला मृतदेह
13
iPhone 17: बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान राडा; सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की!
14
‘२०१४ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्रांची माहिती उपलब्ध करून द्या’, काँग्रेसची मागणी 
15
रेपचा व्हिडिओ, पत्नीची आयडिया; पती विधवा महिलांसोबत बनवायचा संबंध, आरोपीचा खळबळजनक खुलासा
16
अजबच! फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्ट केल्याने तरुणी संतापली, अपहरण करून तरुणाला मारहाण केली, त्यानंतर...
17
श्रद्धा कपूरने दिली प्रेमाची कबुली, शेअर केला मजेशीर व्हिडिओ; बॉयफ्रेंडला टॅग करुन म्हणाली...
18
"फडणवीस साहेबांनी मला बोलावलं अन्...", समीर चौघुलेंनी सांगितला विमानातला किस्सा; म्हणाले...
19
हॉर्लिक्स, विक्स, झंडू बाम, डायपर, टुथपेस्ट... सर्वकाही स्वस्त; दिग्गज कंपन्यांनी जारी केली नवी लिस्ट
20
"एकटं वाटलं की मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते...", रिंकूने सांगितलं कारण, म्हणाली...

बीएसएनएल निर्णायक संघर्षाच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2018 06:31 IST

बीएसएनएल या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीतील २ लाख कर्मचारी आणि अधिकारी ३ डिसेंबर २०१८ पासून देशव्यापी बेमुदत संपावर जात आहेत.

- रंजन दाणी/गुलाब काळे ।बीएसएनएल या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीतील २ लाख कर्मचारी आणि अधिकारी ३ डिसेंबर २०१८ पासून देशव्यापी बेमुदत संपावर जात आहेत. सध्या टेलीकॉम क्षेत्रात तीव्र स्पर्धा सुरू असून, अनेक खासगी कंपन्यांनी या उद्योगातून माघार घेतली आहे. हजारो कोटी रुपयांचे बँक कर्ज घेऊन ज्यांनी आपला उद्योग बंद केला, त्यांचे कर्जाचे ओझे सामान्य करदात्यांच्याच डोक्यावर बसणार आहे.१९९१मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने साम्राज्यवादी जगतिकीकरणाचे धोरण स्वीकारले आणि सर्वच क्षेत्रांवर त्याचा अनिष्ट परिणाम झाला. नॅशनल टेलीकॉम पॉलिसी १९९४ आणि १९९९ च्या माध्यमातून खासगी कंपन्यांनी दूरसंचार व्यवसायात प्रवेश केला. १९९५ ते २००२ या तब्बल ७ वर्षांच्या कालावधीत मोबाइलच्या उद्योगात केवळ खासगी कंपन्यांनाच परवानगी देऊन ‘स्पर्धेच्या’ नावाने खाजगी कंपन्यांची मक्तेदारी लादली गेली. आउटगोइंग कॉल १८ रुपये, तर इनकमिंग कॉल ९ रुपये एवढे प्रचंड दर आकारून या कंपन्यांनी जनतेची अक्षरश: लूूट केली. खासगी कंपन्यांनी विदेशातून येणारे कॉल देशातून आल्याचे दाखवून बीएसएनएल या सार्वजनिक कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान केले.बीएसएनएलला मोबाइल सेवेसाठी परवानगी मिळावी, म्हणून या खात्यातील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटनांनी एकत्र अनेक आंदोलने केली. २००२ मध्ये बीएसएनएल कंपनीचा मोबाइल क्षेत्रात प्रवेश झाला. सर्वप्रथम बीएसएनएलने इनकमिंग कॉल फ्री केला, दर कमी केले आणि सामान्यांच्या हाती मोबाइल दिसू लागला. कृषी प्लॅनसारखी योजना अत्यंत लोकप्रिय झाली आणि खेड्यापाड्यांत व दुर्गम भागात मोबाइलचा अफाट विस्तार झाला. अवघ्या तीनच वर्षांत त्या काळातील आघाडीच्या खासगी कंपनीला मागे टाकून बीएसएनएल पुढे जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झाली. येथूनच बीएसएनएलला संपविण्याचे कारस्थान सरकारी पातळीवर झाले.बीएसएनएलला २००४-०५ मध्ये १० हजार कोटींचा नफा झाला. २००७-०८ मध्ये ९५ मिलियन मोबाइल लाइनचे टेंडर रद्द करून सरकारने बीएसएनएलवर मोठा आघात केला. झपाट्याने होऊ पाहणाºया विस्ताराला एकदम ब्रेक लावला गेला. पुन्हा एकदा सर्व संघटनांनी देशव्यापी संप करून अंशत: का होईना, सरकारला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले. यानंतर मात्र, सरकारने एडीसी चार्जेस रद्द केले. बीडब्ल्यूए स्पेक्ट्रमच्या नावाने १८,५०० कोटी रुपयांसह ३० हजार कोटींची गंगाजळी काढून बीएसएनएलला कफल्लक बनविले.संप, लढे व ट्रेड युनियन चळवळीचा दबाव आणि केंद्रातील सत्ताबदलामुळे बीएसएनएलने पुन्हा भरारी घेण्यास सुरुवात केली. २००९ ते २०१३ पर्यंत तोट्यात असलेली ही कंपनी २०१५-१६ पासून आॅपरेशनल प्रॉफिटमध्ये आली. पुढे सरकारने दिलेले ४-जी स्पेक्ट्रम आणि बँकांचे मोठे कर्ज याद्वारे केवळ एकाच खासगी कंपनीने संपूर्ण देशात सेवा सुरू केली आणि ‘उत्पादन खर्चावर आधारित दर’ ही संकल्पना मोडीत निघाली. खुद्द पंतप्रधानांनी त्यांच्या सिम कार्डची जाहिरात करावी, हा तर बीएसएनएलला संपविण्यासाठीचा तो एक राजाश्रय होता! आणि यासाठी जे हत्यार वापरले गेले, ते ‘फुकट सेवेचे.’ सलग दोन वेळा ट्रायचे नियम धाब्यावर बसवून फुकट सेवा दिली गेली. २७% टक्क्यांनी कंपनीच्या उत्पन्नात घट झाली. त्याने दोन वर्षांत बीएसएनएलची प्रचंड आर्थिककोंडी झाली.बीएसएनएलला बंद करून मर्जितल्या खासगी कंपनीला ग्राहकांना वाटेल तसे लुटण्याचाच परवाना देण्यासाठी हा खटाटोप आहे. ग्राहकांच्या विश्वासावर आम्ही आजवर वाटचाल सुरू ठेवली. ६५ हजार टॉवर्स वेगळे करून बीएसएनएलला मोडीत काढण्याचे धोरण हाणून पाडले. त्या विरोधात देशातील २ लाख कर्मचारी व अधिकाºयांनी लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. हा लढा कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी तर आहेच. कारण आजही बीएसएनएलमध्ये ‘डेप्युट’ केलेल्या उच्चपदस्थ अधिकाºयांना सातवा वेतन आयोग मिळतो आणि कामगार-कर्मचाºयांना वाºयावर सोडले जाते, ही बाब संघटना मुकाट सहन करू शकत नाही.

(बीएसएनएल कर्मचारी संघटना)

टॅग्स :BSNLबीएसएनएल