सोशल मीडियावर सध्या एका भावूक भेटीचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. एका भावाचे यश पाहून दुसऱ्या भावाला होणारा आनंद काय असतो, याचे जिवंत उदाहरण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. एका पोलीस संचलन मैदानावर (Passing Out Parade), आपला धाकटा भाऊ महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाल्याचे पाहून, वनविभागात कार्यरत असलेल्या त्याच्या थोरल्या भावाला आपले अश्रू अनावर झाले.
नेमकी घटना काय? व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये, एक तरुण उभा असल्याचे दिसते. समोरून त्याचा धाकटा भाऊ महाराष्ट्र पोलिसांच्या पूर्ण अधिकृत गणवेशात चालत येतो. आपल्या धाकट्या भावाला पोलीस अधिकारी म्हणून पाहताना थोरल्या भावाचा ऊर अभिमानाने भरून येतो. भावना अनावर झाल्याने तो मोठ्या भावासारखा त्याला मिठी मारतो आणि त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. पोलीस भाऊ आपल्या मोठ्या भावाला अभिमानाने उचलून घेतो.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या दोन्ही भावांचे तोंडभरून कौतुक केले आहे. "दोन्ही भावांनी खाकी वर्दी परिधान करून राज्याची सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण केले, हे पाहून खूप अभिमान वाटतो," अशा प्रतिक्रिया कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत. भावांमधील हे निष्पाप प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर आजच्या काळात दुर्मिळ असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तसेच मोठा भाऊ बापासारखा पाठीशी असतो, असेही अनेकांनी म्हटले आहे.
Web Summary : A heartwarming video shows a forest officer brother overwhelmed with joy as his younger brother joins the Maharashtra Police after passing out parade. The emotional moment captures the bond between the siblings and their shared dream of serving the state.
Web Summary : एक दिल छू लेने वाला वीडियो: वन अधिकारी भाई खुशी से भावविभोर हो गया क्योंकि उसका छोटा भाई पासिंग आउट परेड के बाद महाराष्ट्र पुलिस में शामिल हो गया। भावनात्मक क्षण भाई-बहनों के बीच बंधन और राज्य की सेवा करने के उनके साझा सपने को दर्शाता है।