शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

परशुराम उपरकर यांना जामीन

By admin | Updated: May 28, 2014 04:21 IST

शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेत प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी २५ हजार रूपयांचा जामीन मंजूर केला़

मुंबई : शिवसेनेला जय महाराष्ट्र करून मनसेत प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांना उच्च न्यायालयाने मंगळवारी २५ हजार रूपयांचा जामीन मंजूर केला़ गेले सहा दिवस ते कोठडीत होते़ मालवण येथील तहसिल कार्यालयावर ३ मार्च २००८ रोजी शिवसेनेने मोर्चा काढला होता़ त्यावेळी उपरकर व इतर कार्यकर्त्यांनी पोलीस कामात अडथळा आणला़ याप्रकरणी उपरकर यांच्यासह इतर काहीजणांवर गुन्हा नोंदवण्यात आला़ मालवण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी उपरकर यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावली़ त्याला उपरकर यांनी तेथील सत्र न्यायालयात आव्हान दिले़ २२ मे २०१४ रोजी सत्र न्यायालयाने उपरकर यांची एक वर्षांची शिक्षा एक महिन्यावर आणली़ त्याचवेळी उपरकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्यानंतर उपरकर यांनी सत्र न्यायालयाच्या या निकालाविरोधात अ‍ॅड़ राजेंद्र शिरोडकर व न्या़ अर्चित साखळकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ त्यावर सुट्टीकालीन न्या़ एम़ एस़ सोनक यांच्या समोर सुनावणी झाली़ उपरकर यांना याचा खटला सुरू असताना जामीन मंजूर झाला होता व सत्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतर तात्काळ त्यांना ताब्यात घेण्यात आले़ प्रत्यक्षात त्यांच्या कोठडीची आवश्यकता नाही़ त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी अ‍ॅड़ साखळकर यांनी केली़ ती मान्य करत न्यायालयाने उपरकर यांना जामीन मंजूर केला व सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधातील त्यांची याचिकाही सुनावणीसाठी दाखल करून घेतली़