शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगची गहन समस्या सुटणार?

By admin | Updated: January 30, 2015 05:21 IST

मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंग समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून, यातून मार्ग काढण्यात शासनालाही अपयश आले आहे

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पार्किंग समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून, यातून मार्ग काढण्यात शासनालाही अपयश आले आहे. दक्षिण मुंबईत तर या समस्येने उचल खाल्ली आहे. हे पाहता पार्किंगसाठी अन्य जागा उपलब्ध होते का याची चाचपणी वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी बीपीटीच्या (मुंबई पोर्ट ट्रस्ट) जागांचा वापर होऊ शकतो का यावर विचार सुरू असून, त्यासंदर्भात बीपीटी व्यवस्थापनासोबत बैठकाही झाल्या आहेत. दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खासगी कार्यालये, व्यापारी संकुले, कॉलेज आणि शाळा आहेत. त्यामुळे या भागात दिवसभर वाहनांची वर्दळ असते. कार्यालये आणि व्यवसायाची वाढलेली संख्या पाहता वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येते. या भागाला गेल्या काही वर्षांत पार्किंगच्या समस्येनेही मोठ्या प्रमाणात ग्रासले असून, या पार्किंगमुळेच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असल्याचे वाहतूक पोलीस सांगतात. मोहम्मद अली रोड परिसरात पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अन्य वाहनांना मार्ग काढताना तर अक्षरश: कसरत करावी लागते. त्यातच अवजड वाहनांचीही भर पडत असल्याने मोठी डोकेदुखीच ठरते. त्यामुळे या पार्किंगवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण मुंबईत जवळपास २0 हजार गाड्यांना पार्किंगसाठी जागाच नसल्याचे समोर आले आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या अभ्यास अहवालातून ही बाब समोर आली आहे. यात दुचाकी, तीन आणि चार चाकी वाहनांबरोबरच अवजड वाहनांचाही समावेश आहे. त्यामुळे पार्किंगचा तिढा थोडाफार तरी सुटावा यासाठी बीपीटीच्या काही मोकळ्या पण वापरात नसलेल्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध होतात का याची चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस आणि बीपीटी व्यवस्थापन यांच्यात दोन बैठकाही झाल्या आहेत. यात बीपीटीने त्यांच्या काही मोकळ्या जागा पार्किंगसाठी वापर करण्यासाठी दिल्यास मोठी समस्या दूर होऊ शकते, असे मत वाहतूक पोलिसांकडून मांडण्यात आले होते. यावर बीपीटीकडून अद्याप विचार केला जात आहे. (प्रतिनिधी)