मुंबईसह राज्यातील बहुतांस महागरपालिकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेल्या उद्धवसेनेला मराठवाड्यातील परभणी महानगरपालिकेमध्ये आपला महापौर बसवण्यात यश आले आहे. गुरुवारी झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे सय्यद इकबाल हे विजयी झाले होते. मात्र ज्वलंत हिंदुत्वाचा जप करणाऱ्या उद्धवसेनेने परभणीमध्ये मुस्लिम व्यक्तीला महापौरपदी संधी दिल्याने आता त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, भाजपानेही मुस्लिम महापौरावरून उद्धवसेनेला टोला लगावला आहे.
भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज सकाळी एक कार्टुन प्रासारित करत उद्धवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘हे हिंदुह्रदयसम्राटा, तो उबाठा करी तुज टाटा…’ असं शीर्षक देत शेअर केलेल्या या कार्टुनमध्ये उद्धव ठाकरे हे एका मुस्लिम व्यक्तीची गळाभेट घेत ‘’ये ये तू खरा आमचा आहेस, बाकी मराठी माणूस, हिंदू हे फक्त निवडणुकीपुरते असतात’, असे म्हणताना दाखवले आहे.
दरम्यान, काल झालेल्या परभणी महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेच्या सय्यद इकबाल यांनी भाजपच्या उमेदवाराचा १३ मतांनी पराभव करत महापौरपदाची खुर्ची पटकावली होती. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे अनुभवी नगरसेवक गणेश देशमुख यांनी बाजी मारली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या मतदानात सय्यद इकबाल यांना ३९ मते मिळाली, तर भाजपच्या तिरुमला खिल्लारे यांना २६ मतांवर समाधान मानावे लागले होते. राष्ट्रवादीचे ( अजित पवार) नगरसेवक अक्षय देशमुख आणि अपक्ष नगरसेवक रजिया बेगम यांनीही उद्धवसेनेच्या बाजूने मतदान केल्याने आघाडीचे पारडे जड झाले
Web Summary : Uddhav Sena won Parbhani's mayoral election with Syed Iqbal. BJP criticized Sena for appointing a Muslim mayor, questioning their Hindutva ideology through a cartoon.
Web Summary : उद्धव सेना ने सैयद इकबाल के साथ परभणी का महापौर चुनाव जीता। भाजपा ने मुस्लिम महापौर नियुक्त करने के लिए सेना की आलोचना की, एक कार्टून के माध्यम से उनकी हिंदुत्व विचारधारा पर सवाल उठाया।