Parambir Singh : 'परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट'; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध असल्याचे आरोप - खा. विनायक राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 02:36 PM2021-03-22T14:36:13+5:302021-03-22T14:37:14+5:30

Parambir Singh : परमबीर हा केंद्र सरकारचा बोलका पोपट असून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी ते हे कृत्य करत आहेत.   

Parambir central government's talking parrot; Alleged family ties to those linked to the underworld | Parambir Singh : 'परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट'; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध असल्याचे आरोप - खा. विनायक राऊत 

Parambir Singh : 'परमबीर केंद्र सरकारचा बोलका पोपट'; अंडरवर्ल्डशी लिंक असलेल्यांशी घरोब्याचे संबंध असल्याचे आरोप - खा. विनायक राऊत 

Next
ठळक मुद्देपरमबीर यांनी प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला उशिरा रात्री सुरु असलेल्या भरत शाह यांच्या पबवर कारवाई करण्यास न देता त्यांनाच निलंबित केले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या गृहमत्र्यांवरील आरोपामुळे रण पेटलेले असताना आपल्या बेकायदेशीर आदेशाचे पालन न करणाऱ्या गावदेवी पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या पोलीस निरीक्षकास खोटया गुन्ह्यामध्ये अडकवून त्याचे निलंबन केल्याचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक आरोप केला. तसेच निकटवर्तियांवर गुन्हा दाखल करू नये असा दबाब गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना अनुप डांगे यांच्यावर परमबीर सिंग यांनी टाकला असल्याबाबत पत्र डांगे यांनी लिहिले असून भरत शाह आणि जितू नवलानी यांच्याशी परमबीर यांचे संबंध असून त्यांचे अंडरवर्ल्डशी देखील संबंध आहे. परमबीर हा केंद्र सरकारचा बोलका पोपट असून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी ते हे कृत्य करत आहेत.   

 

परमबीर यांनी प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला उशिरा रात्री सुरु असलेल्या भरत शाह यांच्या पबवर कारवाई करण्यास न देता त्यांनाच निलंबित केले. परमबीर भ्रष्टाचारी असल्याची जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.  नोव्हेंबर २०१९ मध्ये चुकीचे आदेश देऊन आपल्या ओळखीच्या निकटवर्तियांवर गुन्हा दाखल करू नये असा दबाव गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक असताना अनुप डांगे यांच्यावर परमबीर सिंग यांनी टाकला. मात्र, कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकारी यांची परमबीर सिंग यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदी विराजमान झाल्यानंतर ४ जुलै २०२० मध्ये साऊथ कंट्रोल रूमला बदली केली. नंतर १८ जुलै २०२० मध्ये थेट अनुप डांगे यांचं निलंबन करण्यात आलं. त्यानंतर न्यायासाठी अनुप डांगे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर पुन्हा आज देखील त्यांनी पत्र पाठवून अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या आणि मोक्का कायदा अंतर्गत शिक्षा झालेल्या आरोपीसोबत मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे कसे घरोब्याचे संबंध आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती त्यांनी पत्रातून दिली आहे. तसेच खाकीवर हात उचलणाऱ्यांवर परमबीर सिंग कसं बळ देतात. तर शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवणाऱ्या पोलिसाला निलंबित करून कशाप्रकारे त्याचे करिअर बरबाद केलं जाते याची इत्यंभूत माहिती पत्रातून डांगे यांनी दिली आहे. त्यावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार आणि निलंबित पोलीस अधिकाऱ्याला न्याय मिळवून देणार का ? याकडे लक्ष आहे. 

Parambir Singh : आता परमबीर सिंगांवरच नवा लेटरबॉम्ब; मला निलंबित करून माझं करिअर बरबाद केलं 

 

नेमकं कोणत्या गुन्ह्यात डांगे यांनी केली कारवाई 

गावदेवी पोलीस ठाण्याच्या पोलिसाला मारहाण झाल्याच्या प्रकरणात सहआरोपी असलेले चित्रपट निर्माते भरत शहा व त्यांचा मुलगा राजीव यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने डिसेंबर २०१९मध्ये अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

 

दक्षिण मुंबईतील भुलाभाई देसाई रोडवरील 'डर्टी बन्स' या पबमध्ये काही दिवसांपूर्वी पहाटेच्या वेळेस दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी नाईट राउंडला अनुप डांगे होते. त्यांनी लेट नाईट सुरु असलेल्या पबबाबत विचारणा केली. त्यावेळी त्यांनाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने धमकावण्यात आले होते. गावदेवी पोलिस ठाण्यातील पोलिस तिथे पोचले असता, भरत शहा यांचा नातू यश याने पोलिसाला मारहाण केली, असा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून यश व अन्य दोन जणांना अटक केली. त्यानंतर भरत शहा (७५) व त्यांचा मुलगा राजीव (५५) पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनीही पोलिसांविषयी अर्वाच्य भाषा वापरली आणि पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, अशा आरोपाखाली पोलिसांनी आणखी एक गुन्हा नोंदवला. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असल्याने या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. 'पोलिस हे यश व अन्य दोघांना अमानवी पद्धतीने मारहाण करत होते. त्यावेळी संबंधित पोलिस अधिकारीच आक्रमकपणे वागत होता आणि उलट आमच्याविरुद्धच गुन्हा नोंदवण्यात आला', असा आरोप शहा पितापुत्रांनी अर्जात केला होता.

Web Title: Parambir central government's talking parrot; Alleged family ties to those linked to the underworld

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.