लोकमत न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर: भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर समोर आला. सुदैवाने पायलट आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांमुळे उड्डाणापूर्वीच हा प्रकार समोर आल्याने दुर्घटना टळली. या घटनेनंतर त्या दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना झाल्या.
पंकजा मुंडे या सोमवारी छत्रपती जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आल्या होत्या. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्या लातूर जिल्ह्यातील त्यांच्या नियोजित सभांसाठी विमानतळावरून रवाना होणार होत्या. त्याचवेळी बिघाडामुळे हेलिकॉप्टरचे उड्डाण अशक्य असल्याचे पायलट, तांत्रिक कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘एटीसी’कडे नोंदपंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची नोंद विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलकडे (एटीसी) करण्यात आली.
खराब हवामानामुळे विलंबमुंबईहून येणाऱ्या दुसऱ्या हेलिकॉप्टरलाही विलंब झाला. खराब हवामानामुळे या हेलिकॉप्टरला उशीर झाल्याची माहिती विमानतळाच्या सूत्रांनी दिली.
Web Summary : BJP leader Pankaja Munde's helicopter faced a technical issue at Chhatrapati Sambhajinagar Airport. A major accident was avoided due to timely detection before takeoff. She later departed for Latur by another helicopter after the incident was recorded with Air Traffic Control. Bad weather delayed the replacement helicopter.
Web Summary : भाजपा नेता पंकजा मुंडे के हेलीकॉप्टर में छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे पर तकनीकी खराबी आई। उड़ान से पहले पता चलने से बड़ा हादसा टल गया। घटना के बाद वह दूसरे हेलीकॉप्टर से लातूर के लिए रवाना हुईं। खराब मौसम के कारण दूसरे हेलीकॉप्टर में देरी हुई।