Pankaja Munde : मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे पहिले ट्विट, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:54 IST2022-08-09T13:54:01+5:302022-08-09T13:54:45+5:30
Pankaja Munde: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मात्र या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

Pankaja Munde : मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडेंचे पहिले ट्विट, म्हणाल्या...
मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा आज अखेर मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) झाला. मंगळवारी शिंदे गटाच्या आणि भाजपच्या मिळून एकूण 18 मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्याला भाजपचे (bjp) वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसेच, विरोध पक्षनेते अजित पवार सुद्धा उपस्थित होते. मात्र, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मात्र या शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर पंकजा मुंडे यांनी नव्या मंत्र्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे. "नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना", अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी शेअर केले आहे.
नवनिर्वाचित मंत्री मंडळातील सर्व मंत्री महोदय यांचे अभिनंदन.... महाराष्ट्र अपेक्षा ठेवून पाहत आहे आपल्याकडे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा... विकास आणि विश्वास याची जोड ठेवून तुम्ही सर्व जण काम करून महाराष्ट्र राज्याची भरभराट कराल अशी शुभकामना 🙏🏻..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) August 9, 2022
पंकजा मुंडे यांचा पत्ता विधान परिषद निवडणुकीतही कापण्यात आला होता. तसेच केंद्रीय मंत्रीमंडळातही बीडच्या खासदार प्रितम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये तरी पंकजा मुंडे यांना मंत्रीपद मिळणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. इतर नेत्यांना फोन आल्याची चर्चा आहे. मात्र, पंकजा मुंडे यांना फोन आला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज आहेत का? की इतर कामात व्यस्त असल्यामुळे त्या आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिल्या नाहीत, अशीही चर्चा रंगली आहे.