पंकजा मुंडेंनी माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नाही; भाजप आमदारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 10:37 IST2024-12-19T10:36:54+5:302024-12-19T10:37:22+5:30
कर नाहीतर डर कशाला असा थेट पवित्रा घेत मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंकजा मुंडेंनी माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नाही; भाजप आमदारांचा आरोप
मंगेश व्यवहारे
नागपूर : विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर बीड जिल्ह्यात भाजप मध्येच वादाची ठिणगी पेटली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांनी निवडणुकीत माझ्या मतदारसंघात भाजपचे काम केले नसल्याचा आरोप केला आहे.
यासंदर्भात दर्शनी पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे त्यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. कर नाहीतर डर कशाला असा थेट पवित्रा घेत मंत्री पंकजा मुंडे यांच्यावरच आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
यावेळी त्यांनी बीडमध्ये सध्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे प्रचंड तणावाचे वातावरण आहे. विरोधक या प्रकरणात धनंजय मुंडेवर आरोप करीत आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनीही कणखर भूमिका घेतली असून, या हत्ये प्रकरणात विष्णू चाटे व त्याच्या टोळीचा मोरक्या कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाईची मागणी धस यांनी केली आहे.