Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:33 IST2025-06-20T10:30:32+5:302025-06-20T10:33:52+5:30

Pandharpur Wari 2025: पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे.

Pandharpur wari 2025 News Updates | Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : पालखी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा चार ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे गर्दीवर नियंत्रण, भाविकांची संख्या मोजणे, चेन स्नॅचिंग किंवा इतर घटना घडू नयेत, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जाणार आहे. तसेच सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.

मागील चार दिवसांपासून विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी हे सोलापूर ग्रामीण दलाची पाहणी करीत आहेत. पुण्यापासून ते सोलापूरपर्यंतच्या पालखी मार्गावर पाहणी केली.  पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सुरक्षेची व्यवस्था केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांचा बंदोबस्त टप्प्याटप्प्याने लावण्यात येईल. याशिवाय पोलिस महासंचालक कार्यालयाकडूनही बॉम्बशोधक पथक, एसआरपीएफ पथके तैनात करण्यात येणार आहेत. हा बंदोबस्त दिंडीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असेल. यंदा वारीसोबत जनरेटरही असणार आहे.

बाहेर पडण्याचा मार्ग बदलला
मंदिर परिसरात दर्शन घेतल्यानंतर भाविक नामदेव पायरी तेथून घाटाकडे, व्हीआयपी गेट अशा विरुद्ध दिशेने पुन्हा मंदिर परिसरात येतात. त्यामुळे या परिसरात भाविकांची गर्दी होते. यासाठी पोलिस प्रशासनाकडून गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावण्यात येणार आहेत. शिवाय दर्शनानंतर भाविक मंदिराला वळसा घालून तुकाराम भवन, पश्चिम घाट मार्गे बाहेर पडतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी यंदा नदीपात्रात असणाऱ्या बोटी आणि होडीचालकांची मान्यता, त्यांचे प्रशिक्षण, सुरक्षेचे साहित्य याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती फुलारी यांनी दिली.

निवासाची सोय
वर्षभर यात्रेच्या काळात बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांच्या निवासस्थानासाठी पंढरपूर येथे इमारती बांधण्यासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला असून चार मजली इमारतीमध्ये डॉरमॅट्रीसारखी सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती फुलारी यांनी दिली.

Web Title: Pandharpur wari 2025 News Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.