शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पालघर गुजरातचं की महाराष्ट्राचं?; चक्क गुजराती भाषेत निघाली अधिसूचना, स्थानिकांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 19:38 IST

हिंदीत पत्रक असतानाही गुजराती भाषेत काढलेले वेगळे पत्रक अनेकांना पचनी पडलेले नाही.

अनिरुद्ध पाटील

बोर्डी - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय मार्ग (४८) हा १९ आणि २० जानेवारी रोजी मुंबईकडे जाणाऱ्या जड अवजड वाहनांसाठी बंद केला आहे. याबाबत पालघर जिल्हा प्रशासनाने वाहतूक नियंत्रण अधिसूचनेचे काढलेले गुजराती भाषेतील पत्रक सोशल मीडियावर फिरत असल्याने पालघर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या गुजराती प्रेमावर टीका होत आहे.

अनेकांकडून संताप व्यक्त

या अधिसूचनेनुसार हा राष्ट्रीय महामार्ग जड अवजड वाहनांसाठी १९ जानेवारी रोजी सकाळी ८ ते रात्री १० तसेच २० जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी २ या कालावधीत बंद राहणार आहे. हे पत्रक मराठी, हिंदी तसेच गुजराती भाषेत असून काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसवर हे पत्रक पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या राष्ट्रीय मार्गावरून उत्तर भारताच्या अनेक राज्यातील वाहने मुंबईकडे जातात. मात्र हिंदीतही पत्रक होते.पत्रकामुळे वादाला तोंड

काही वर्षांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या डहाणू ते पनवेल मेमू गाडीच्या डब्यातील इंडिकेटरवर गुजराती भाषेतील सूचना वादाचा विषय ठरली होती. आता पालघर जिल्हाधिकारी प्रशासनाने गुजराती भाषेत काढलेल्या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेच्या पत्रकाने वादाला तोंड फुटले आहे.

'त्यांना' मराठीचा पुळका नाही

सीमेलगत गुजरातच्या भिलाड येथे रेल्वे अंडर पास नवीन सिमेंट बोगद्याचे काम १८ जानेवारीपासून सुरू असल्याने हा मार्ग बंद आहे. परंतु तेथील प्रशासनाने मराठीतून वाहतूक सूचना असलेले पत्रक काढलेले नाही. पालघर जिल्ह्यातील मराठी भाषिक वाहनचालक या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. मात्र तेथील प्रशासनाला मराठीचा पुळका नाही, पालघर प्रशासनाने का गुजराती भाषेतून पत्रक काढले या मुद्द्यावर प्रशासन टीकेचे धनी झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Palghar: Gujarat or Maharashtra? Gujarati notice sparks outrage.

Web Summary : Palghar administration's Gujarati traffic notice regarding highway closure sparks controversy. Locals are angered by the preference for Gujarati over Marathi, questioning administrative priorities near the Gujarat border.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रpalgharपालघरtraffic policeवाहतूक पोलीस